• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत; बाजारपेठ पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 9, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

भुसावळ, प्रतिनिधी : शहरातील शिवाजी नगर भागातील २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह वरणगाव रोडवरील वॉटर पार्कजवळ गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

भूषण उल्हास वावरे (वय २१, रा. गोपाळ नगर, डी.एल. हिंदी विद्यालयामागे, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे आणि रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. मात्र, ही दुखापत नेमकी कशी झाली, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही.

वॉटर पार्कजवळ एका तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला.

भूषण या परिसरात नेमका कधी आणि कोणासोबत आला होता? त्याच्यासोबत काही घटना घडली होती का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासातून तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


 

Next Post
चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

ताज्या बातम्या

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

November 22, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा
जळगाव जिल्हा

जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा

November 22, 2026
सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट
खान्देश

सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट

November 22, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या
जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या

November 22, 2026
जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्हा

जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन

November 22, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप
कृषी

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add