• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 2, 2026
in गुन्हे
0
पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

​चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडती गावात रविवारी सकाळी एका अमानुष घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. वडती गावात एका नराधम पित्याने झोपेत असलेल्या स्वतःच्याच दोन अल्पवयीन मुलांवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. या क्रूर हल्ल्यात १३ वर्षीय चिमुकलीचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला, तर ११ वर्षांचा लहानगा गंभीर जखमी झाला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मीरा सुभाष भिलाला (वय १३) असे मृत मुलीचे नाव असून, रामु सुभाष भिलाला (वय ११) हा मुलगा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सकाळी दोन्ही मुले घरात गाढ झोपेत असताना, संशयित आरोपी सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०) याने धारदार कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार केले. हल्ल्याच्या तीव्रतेमुळे मीराचा जागीच प्राण गेला, तर रामु रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

​घटनेनंतर आरोपी पिता जंगलाच्या दिशेने फरार झाला होता. या थरारानंतर परिसरात खळबळ उडाली असून अडावद पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवत जंगलात शोधमोहीम राबवली आणि संशयित आरोपी सुभाष भिलाला याला ताब्यात घेतले.

​बापाने स्वतःच्याच पोटच्या गोळ्यांवर असा भयंकर हल्ला का केला, यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक आजारपण की अन्य काही कारण, या सर्व शक्यतांचा पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे जप्त केले असून, आरोपीविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे वडती गावासह संपूर्ण चोपडा तालुक्यातून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: chopdaCrimemurderPolice

ताज्या बातम्या

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

July 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add