• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उसनवारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेवर कारमध्ये अतिप्रसंग; जळगावातील धक्कादायक घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 29, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
उसनवारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेवर कारमध्ये अतिप्रसंग; जळगावातील धक्कादायक घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : उसनवारीचे पाच हजार रुपये देण्याच्या बहाण्याने बोलावून नाशिक येथील एका २८ वर्षीय महिला ब्युटीपार्लर चालकावर भरदुपारी कारमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २४ जून रोजी दुपारी १ वाजता सागर पार्कजवळ घडली. याप्रकरणी २७ जून रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आरोपी सुनील मधुकर चौधरी (रा. धरणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील पीडित महिला घटस्फोटीत असून, तिची गेल्या फेब्रुवारी महिन्यात सुनील चौधरी याच्याशी ओळख झाली होती. सुनीलने आपण प्रॉपर्टीचे काम करत असल्याचे सांगून तिचा मोबाईल क्रमांक घेतला व संपर्क वाढवला होता. २४ जून रोजी पीडित महिला जळगावात आली असता, सुनीलने तिला पाच हजार रुपये देतो असे सांगून सागर पार्कजवळ बोलावले.

​त्यानंतर तिला एका कारमध्ये बसवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने त्यास नकार दिला असता, सुनीलने तिला जबर मारहाण केली आणि वाहनातच तिच्यावर बलात्कार केला.

​कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी..
अत्याचार केल्यानंतर ‘हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला पाहून घेईन’, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली. या भीतीपोटी घाबरलेल्या महिलेने तीन दिवस कोणाकडेही तक्रार केली नाही. मात्र, तिच्या एका मैत्रिणीने तिला धीर दिल्यानंतर २७ जून रोजी पीडित महिलेने जळगाव गाठून रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून सुनील चौधरी याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.

Tags: #cityCrimeJalgaon
Next Post
मंदिराच्या पुजाऱ्याची हल्लेखोरांकडून हत्या; भुसावळात खळबळ

मंदिराच्या पुजाऱ्याची हल्लेखोरांकडून हत्या; भुसावळात खळबळ

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add