• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मंदिराच्या पुजाऱ्याची हल्लेखोरांकडून हत्या; भुसावळात खळबळ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 29, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मंदिराच्या पुजाऱ्याची हल्लेखोरांकडून हत्या; भुसावळात खळबळ

​भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरालगतच्या मिलिटरी स्टेशन कॅम्पस आणि झेडटीआरआय बोगद्याजवळ असलेल्या कालिका माता मंदिराचे पुजारी संतोष रघुवीर मंचल (वय ५५) यांची अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात जड वस्तूने प्रहार करून निर्घृण हत्या केली. सोमवारी (२९ जून) सकाळी १० वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने रेल्वे परिसर आणि भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.

​मृत संतोष मंचल हे गेल्या ६ ते ७ वर्षांपासून मंदिराच्या आवारातील एका पत्राच्या खोलीत राहून पूजा-अर्चा व देखभाल करत असत. सोमवारी सकाळी एक नागरिक मंदिरात दर्शनासाठी गेला असता, त्याला संतोष मंचल रक्ताच्या थारोळ्यात मृत पडलेले आढळून आले. अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर गंभीर वार करून त्यांना जागीच ठार केले होते. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबाने घटनास्थळी एकच आक्रोश केला.

​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उप पोलीस अधीक्षक केदार बारबोले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ शहर पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जळगाव येथून ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​हा खून चोरीच्या उद्देशाने, जुन्या वैमनस्यातून की कौटुंबिक वादातून झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी एलसीबी आणि शहर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून लवकरच या गुन्ह्याचा छडा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Tags: BhusawalCrimePolice
Next Post
ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली; शोकसभा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली; शोकसभा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add