• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चाकू हल्ला करून लुटणारी टोळी जेरबंद; तालुका पोलिसांची धडक कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 21, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
चाकू हल्ला करून लुटणारी टोळी जेरबंद; तालुका पोलिसांची धडक कारवाई

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव-भुसावळ बायपास रोडवर ट्रक चालकाला अडवून, चाकूने वार करत जबरदस्तीने लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगार टोळीचा जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ३ मुख्य आरोपींना अटक केली असून, एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले आहे.

​याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक २० जून २०२६ रोजी रात्री १:०० वाजेच्या सुमारास फिर्यादी ट्रक चालक मुकेश रामराव राठोड (वय ३०, रा. गांधी चौक, हरीओम नगर, जालना) हे आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. MH-21-BH-3536) घेऊन पाळधी जवळून जात होते. दरम्यान, चारचाकी व दुचाकीवरून आलेल्या ४ अज्ञात आरोपींनी त्यांचा ट्रक अडवला. मुख्य आरोपी शेख साहिल शेख जब्बार उर्फ काल्या व त्याच्या ३ साथीदारांनी ट्रकवर दगडफेक केली.

तसेच फिर्यादी व क्लिनरला बेदम मारहाण करत, एका आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हातावर चाकूने तीन वेळा वार करून गंभीर दुखापत केली. एवढेच नव्हे तर, आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील ५,५०० रुपये रोख आणि मोबाईल फोनवरील फोन पे (PhonePe) स्कॅनरद्वारे ऑनलाइन ९८४ रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले व घटनास्थळावरून फरार झाले. जखमी चालकावर सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

​या प्रकरणी फिर्यादीच्या जबाबावरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी डीबी पथक त्वरित रवाना केले. पथकाने अत्यंत कसोशीने व गुप्त माहितीच्या आधारे शोध घेत अवघ्या १२ तासांच्या आत ३ मुख्य आरोपींना जेरबंद केले.

​अटक करण्यात आलेले आरोपी व गुन्हेगारी पार्श्वभूमी..
१. साहिल शेख जब्बार शेख उर्फ काल्या (वय २६, रा. पाळधी, भवानी मंदिरासमोर, ता. धरणगाव, जळगाव – मुख्य आरोपी). हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर धरणगाव पोलीस स्टेशन येथे बस अडवून चालकास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
२. विशाल चुडामण पाटील (वय १८, रा. हॉटेल साई पॅलेस मागे, बिबा नगर, जळगाव). याच्यावर देखील रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे दरोड्यासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे.
३. मोहित हेमंत गुजर (वय १९, रा. प्लॉट नंबर ४५, मयूर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव).
४. या गुन्ह्यातील चौथा आरोपी विधीसंघर्षीत बालक असून त्यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

​सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस हवालदार प्रदीप राजपूत, योगेश पाटील, अविनाश देवरे, कैलास इंगळे, पंकज देशमुख, प्रशांत ठाकूर, मिलींद सपकाळे, आणि गणेश पाटील यांनी केली आहे.


 

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
जळगाव विधान परिषद निवडणूक: महायुतीचे नंदकिशोर महाजन ५७७ मतांनी विजयी!

जळगाव विधान परिषद निवडणूक: महायुतीचे नंदकिशोर महाजन ५७७ मतांनी विजयी!

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add