• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गुजरातधून चोरी झालेली कार जळगावात जप्त; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 21, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गुजरातधून चोरी झालेली कार जळगावात जप्त; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

​जळगाव, (प्रतिनिधी) : गुजरात राज्यातील अहमदाबाद ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या बोपल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली ९ लाख रुपये किमतीची कार जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत शिताफीने जप्त केली आहे. नशिराबाद टोलनाका ओलांडून ही कार जळगावात प्रवेश करत असताना पोलिसांनी थरारक पाठलाग करून अजंठा चौफुली परिसरात वाहन चालकासह कार ताब्यात घेतली.

​याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोपल पोलीस स्टेशन (अहमदाबाद ग्रामीण, गुजरात) हद्दीतून दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी ९ लाख रुपये किमतीची ‘किया कॅरेन्स’ मोटर कार (क्र. एम पी ०४ झेड एल ५१५५) चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील चोरीची कार दिनांक १८ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास नशिराबाद टोलनाका ओलांडून जळगावच्या दिशेने येत आहे, अशी गोपनीय माहिती बोपल पोलीस स्टेशनकडून जळगावच्या एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती.

​काशीनाथ चौकात नाकाबंदी, चालकाचा पळण्याचा प्रयत्न..
​मिळालेल्या माहितीच्या आधारे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे अंमलदार पोहेकॉ संदीप सपकाळे, पोकॉ रमेश अहिर आणि पोकॉ अफजल बागवान यांनी १८ जून रोजी सायंकाळी ७:१५ वाजता काशीनाथ चौकात तातडीने नाकाबंदी लावली. संशयित कार येताना दिसताच अंमलदारांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने कार काशीनाथ चौकातून अजंठा चौफुलीच्या दिशेने पळवली.

​पाठलाग करून कार केली जप्त..
​कार न थांबवता चालकाने पळ काढल्याने पोलीस अंमलदार रमेश अहिरे आणि अफजल बागवान यांनी तात्परतेने स्वतःच्या वाहनाने त्याचा थरारक पाठलाग सुरू केला. अंमलदारांनी अजिंठा चौफुली परिसरात अत्यंत हुशारीने संशयित वाहन अडवले. वाहन चालकाकडे कसून चौकशी केली असता, सदर कार ही गुजरातधून चोरीला गेलेलीच असल्याची खात्री पटली. पोलिसांनी तात्काळ वाहन आणि चालकाला ताब्यात घेऊन एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गाठले.

​आरोपी आणि कार गुजरात पोलिसांच्या स्वाधीन..
​या यशस्वी कारवाईबाबत बोपल पोलीस स्टेशन (अहमदाबाद ग्रामीण) यांना तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानुसार, १९ जून २०२६ रोजी बोपल पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार जळगावात हजर झाले. जळगाव पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुमारे ९,००,०००/- रुपये किमतीची किया कार आणि संशयित चालकाला बोपल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

​सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार संदीप सपकाळे, रमेश अहिरे आणि अफजल बागवान यांच्या पथकाने केली आहे. या धाडसी कामगिरीबद्दल पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 

Tags: #jalgaon_city#midcpoliceCrimeJalgaon
Next Post
जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला नियमित योगा, व्यसनमुक्तीचा संकल्प

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला नियमित योगा, व्यसनमुक्तीचा संकल्प

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add