• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द प्रकरणी अभाविप जळगाव शाखेचे निदर्शने

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 15, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द प्रकरणी अभाविप जळगाव शाखेचे निदर्शने

जळगाव, (प्रतिनिधी) : नीट-यूजी २०२६ परीक्षेमध्ये समोर आलेल्या अनियमितता, पेपर लीक व परीक्षा प्रक्रियेतील गंभीर त्रुटींच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव शाखेतर्फे शहरातील काव्यरत्नावली चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये ११ वी-१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, नीटचे परीक्षार्थी तसेच अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा”, “NTA जवाब दो”, “पेपर माफियांवर कठोर कारवाई करा” अशा घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. अभाविपने नेशनल नेशनल टेस्टिंग एजेंसीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

अभाविपने स्पष्ट केले की, २०२४ मध्ये अशा प्रकारच्या घटना समोर आल्यानंतरही पुन्हा परीक्षा प्रक्रियेमध्ये अनियमितता होणे अत्यंत दुर्दैवी व निराशाजनक आहे. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षेची तयारी करत असताना अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे.

यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाऊ शकत नाही. पेपर लीक व परीक्षा घोटाळ्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी संयम राखावा, अफवांवर विश्वास ठेवू नये. अभाविप प्रत्येक विद्यार्थ्याच्या न्यायासाठी ठामपणे लढत राहील.”

अभाविप जळगाव महानगर मंत्री वरद पांढारकर यांनी सांगितले की, “नीट परीक्षा व्यवस्थेतील वारंवार समोर येणाऱ्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. पारदर्शक व विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी अभाविप रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील.”

यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ.वरुणराज नन्नवरे, जळगांव महानगर सहमंत्री वरद पांढारकर, ललित सोनार, गणेश दुसाने, मोहित सोनी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
नोकरीची सुवर्णसंधी | जिल्ह्यातील युवकांसाठी ‘शिका व कमवा’ या धोरणाअंतर्गत भरती मेळावा

नोकरीची सुवर्णसंधी | जिल्ह्यातील युवकांसाठी 'शिका व कमवा' या धोरणाअंतर्गत भरती मेळावा

ताज्या बातम्या

कमी वजन, मुदतपूर्व जन्म… तरीही जिद्दीने जिंकली मृत्यूशी झुंज!
आरोग्य

कमी वजन, मुदतपूर्व जन्म… तरीही जिद्दीने जिंकली मृत्यूशी झुंज!

May 15, 2026
नोकरीची सुवर्णसंधी | जिल्ह्यातील युवकांसाठी ‘शिका व कमवा’ या धोरणाअंतर्गत भरती मेळावा
जळगाव जिल्हा

नोकरीची सुवर्णसंधी | जिल्ह्यातील युवकांसाठी ‘शिका व कमवा’ या धोरणाअंतर्गत भरती मेळावा

May 15, 2026
नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द प्रकरणी अभाविप जळगाव शाखेचे निदर्शने
जळगाव जिल्हा

नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द प्रकरणी अभाविप जळगाव शाखेचे निदर्शने

May 15, 2026
‘आमच्या परिचारिका, आमचे भविष्य’; डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका दिन साजरा
आरोग्य

‘आमच्या परिचारिका, आमचे भविष्य’; डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका दिन साजरा

May 15, 2026
गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘TWY’ कंपनीचा जळगाव शाखा प्रमुख जेरबंद
गुन्हे

गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘TWY’ कंपनीचा जळगाव शाखा प्रमुख जेरबंद

May 15, 2026
डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयात ‘आरोहण २०२६’चा दिमाखदार समारोप
जळगाव जिल्हा

डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयात ‘आरोहण २०२६’चा दिमाखदार समारोप

May 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group