• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नोकरीची सुवर्णसंधी | जिल्ह्यातील युवकांसाठी ‘शिका व कमवा’ या धोरणाअंतर्गत भरती मेळावा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 15, 2026
in जळगाव जिल्हा
0
नोकरीची सुवर्णसंधी | जिल्ह्यातील युवकांसाठी ‘शिका व कमवा’ या धोरणाअंतर्गत भरती मेळावा

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील युवकांना नामांकित औद्योगिक कंपनीत करिअर घडविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि निमजाई फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. कंपनीत “शिका व कमवा” या धोरणाअंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा दिनांक १९ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून निमजाई फाउंडेशन (ट्रेनिंग सेंटर, कालीका माता मंदिर परिसर, स्टेट बँक ऑफ इंडिया वर, जळगाव) येथे आयोजित करण्यात आला असून, उमेदवारांची जागेवरच निवड केली जाणार आहे.

या उपक्रमांतर्गत ऑटोमोटिव्ह वेल्ड टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह पेंट टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह असेंब्ली टेक्निशियन आणि मेकॅट्रॉनिक्स टेक्निशियन या ट्रेडमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षांचा असून त्यानंतर एक वर्षाची अप्रेंटिसशिपची संधी मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

या भरतीसाठी १८ ते २५ वयोगटातील १०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा, बी.कॉम व बी.एस्सी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवासी व भोजन सुविधा, शैक्षणिक साहित्य तसेच मासिक विद्यावेतन दिले जाणार आहे. पहिल्या वर्षी रुपये १७,०८०/- तर दुसऱ्या वर्षी रुपये १८,४४१/- इतके विद्यावेतन देण्यात येईल.

इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नोंदणी करून उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावा. तसेच ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंडजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 

Next Post
कमी वजन, मुदतपूर्व जन्म… तरीही जिद्दीने जिंकली मृत्यूशी झुंज!

कमी वजन, मुदतपूर्व जन्म... तरीही जिद्दीने जिंकली मृत्यूशी झुंज!

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add