• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बालक पालकांसाठी रंगणार ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशनचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 23, 2026
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
बालक पालकांसाठी रंगणार ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

जळगाव, (प्रतिनिधी) : परिक्षा संपल्यानंतर लागणाऱ्या सुट्टीत बालकांच्या मनोरंजनासोबतच त्यांच्यावर उत्तम संस्कार व्हावेत आणि त्यांना जागतिक दर्जाचे सिनेमे पाहता यावेत तसेच पाल्यांसोबत पालकांना देखिल आपले बालपण अनुभवता यावे या उद्देशाने जळगावात दि.२४, २५ आणि २६ एप्रिल असा तीन दिवसीय ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन शहरातील भाऊंचे उद्यान येथील एम्फी थिएटर येथे करण्यात आले आहे.

अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवास प्रवेश विनामूल्य आहे. दि.२४, २५ आणि २६ एप्रिल दररोज सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या गंमत जंमत बालचित्रपट महोत्सवात आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये व्यग्र असणाऱ्या बालकांना मोठ्या पडद्यावर दर्जेदार, प्रबोधनात्मक आणि आशयघन असणारे मनोरंजनात्मक चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

या महोत्सवाचे उद्‌घाटन दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता महापौर दीपमाला काळे यांच्याहस्ते संपन्न होणार आहे. चित्रपट हे शिक्षणाचे आणि प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम आहे. मनोरंजनातून व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी हा एक सुवर्णयोग आहे, त्यामुळे जळगावमधील जास्तीत जास्त बालक – पालकांनी या चित्रपट महोत्सवाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Tags: #jalgaon_city
Next Post
JCL T-20: चाळीसगाव चॅलेंजर्सचा थरारक विजय; तर रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर

JCL T-20: चाळीसगाव चॅलेंजर्सचा थरारक विजय; तर रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add