• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

JCL T-20: चाळीसगाव चॅलेंजर्सचा थरारक विजय; तर रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 23, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
JCL T-20: चाळीसगाव चॅलेंजर्सचा थरारक विजय; तर रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित ‘जळगाव क्रिकेट लिग-२०२६’ (JCL) स्पर्धेत सहाव्या दिवशी चुरशीचे सामने पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सने रावेर रॉयल्सचा पराभव करत आगेकूच केली, तर दुसऱ्या सामन्यात जळगाव कोगटा किंग्सने जामनेर सातपुडा हिरोजवर १०१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

​चाळीसगावचा विजय, रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर..
​प्रथम फलंदाजी करताना चाळीसगाव संघाने ५ बाद १८३ धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार ओम मुंडे (८५ धावा) आणि साहिल गायकर (७७ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीमुळे संघाला भक्कम स्थिती प्राप्त झाली. रावेरच्या संदेश सुरवाडेने २ बळी घेतले.
​१८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रावेर रॉयल्सचा संघ १९.३ षटकांत १७५ धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि अवघ्या ८ धावांनी सामना हरल्याने स्पर्धेतून बाहेर पडला. चाळीसगावच्या अमेय कोळी आणि सरज पाटील यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ओम मुंडेला ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

​कोगटा किंग्सचा दबदबा; जामनेरचा डाव ८५ धावांत आटोपला..
​दुसऱ्या सामन्यात जळगाव कोगटा किंग्सने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात वर्चस्व गाजवले. सलामीवीर ओम भोसले (६४) आणि जितेंद्र नाईक (६४) यांच्या १०२ धावांच्या सलामीच्या जोरावर कोगटा किंग्सने ८ बाद १९६ धावा केल्या. जामनेरच्या ललित पाटीलने ३ बळी घेतले.

​१९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जामनेर सातपुडा हिरोजची अवस्था अत्यंत खराब झाली. कोगटा किंग्सच्या सागर भावर (३/१२), राज बेलदार आणि बिपिन चांगरे यांच्या भेदक माऱ्यासमोर जामनेरचा पूर्ण संघ १९.४ षटकांत केवळ ८५ धावांत गारद झाला. ओम भोसले याला ‘मॅन ऑफ दी मॅच’ घोषित करण्यात आले.
​


 

Tags: #jalgaon_city#JCL T20#sports
Next Post
जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add