• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 16, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जिल्हापेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मालेगाव येथील तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या दोन महागड्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

​दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगावच्या नवीन बसस्थानक परिसरातून एक मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते.

​जिल्हापेठ पोलिसांना मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मालेगाव येथील संशयितांचा माग काढला. पोलिसांनी सापळा रचून मलीक अल्ताफ अहमद अन्सारी, मोहम्मद मुज्जमील अब्दुल खालक, अबुबकर नईम कौसर (सर्व रा. मालेगाव) या तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

​सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या त्रिकुटाने कसून चौकशी केल्यावर जळगाव येथून हिरो होंडा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. न्यायालयाने या तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ​कोठडी दरम्यान झालेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. हे आरोपी नाशिक येथून टीव्हिएस रायडर या चोरीच्या दुचाकीवर जळगावात आले होते. ही दुचाकी त्यांनी एका साक्षीदाराला “कागदपत्रे नंतर देतो” असे सांगून विकली होती. विशेष म्हणजे, ज्या गाडीवर ते आले होते, त्याच गाडीवर त्यांनी स्वतःला बसस्थानकापर्यंत सोडायला लावले आणि तिथून दुसरी गाडी चोरून मालेगावकडे पळ काढला होता.

​ही यशस्वी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ​तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख, पोलीस हवालदार महेश महाजन, नरेश सोनवणे, संतोष सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे, राहुल पाटील, नरेंद्र दिवेकर, अमित मराठे व प्रवीण जाधव यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत.
​

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

ताज्या बातम्या

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार
जळगाव जिल्हा

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार

August 3, 2026
बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न

August 3, 2026
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ

August 3, 2026
पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add