• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 16, 2026
in जळगाव जिल्हा
0
कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

​जळगाव, (प्रतिनिधी) : “महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपली कामे कोणत्याही दबावाला बळी न पडता नियमानुसार व प्रामाणिकपणे करावीत. नियमबाह्य कामांसाठी कोणी दबाव आणत असल्यास ती बाब तत्काळ पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत,” असे आश्वासन उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी दिले. जळगाव महानगरपालिकेत आयोजित ‘कर्मचारी संवाद’ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

​या प्रसंगी व्यासपीठावर उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, मुख्य लेखाधिकारी विजयकुमार सोनवणे, सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या संवाद कार्यक्रमात कैलास चौधरी, गौरव सपकाळे, समीर बोरोले, सुजाता पाटील यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने स्थायित्व प्रमाणपत्र, अतिरिक्त कार्यभाराचा मोबदला, पदोन्नती, पगाराची अनिश्चित तारीख, सेवानिवृत्तांची एटीएम सेवा आणि २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे या मागण्यांचा समावेश होता.

​प्रशासनाच्या वतीने उत्तरात सांगण्यात आले की, सध्या मनपात केवळ १३०० कर्मचारी कार्यरत असल्याने कामाचा अतिरिक्त ताण आहे. तरीही, पहिल्या टप्प्यात ४५० जणांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आली असून, नवीन भरतीसाठीची बिंदुनामावली विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आली आहे. तसेच सेवानिवृत्तांच्या थकीत रकमेसाठी तरतूद केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

​शेवटी, ज्या कर्मचाऱ्यांना आज संवाद साधता आला नाही, त्यांनी आपल्या समस्या ४-५ दिवसांत उपमहापौर कार्यालयाकडे लेखी स्वरूपात द्याव्यात, त्यावर सकारात्मक तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही मनोज चौधरी यांनी दिली.
​

Tags: #jalgaon_city#municipalcorporation
Next Post
स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add