• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 15, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात माणुसकीला आणि नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका ३१ वर्षीय महिलेला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर दोन नराधम नातेवाईकांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी एका आरोपीला तातडीने अटक केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेवर १३ मार्चच्या रात्री ११:३० ते १४ मार्चच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास हा घृणास्पद प्रकार घडला. पीडितेचे नातेवाईक असलेल्या दोन आरोपींनी तिला गाठले. यावेळी मुख्य आरोपी राजेश शिवराम पवार याने पीडितेला गुंगीचे पेय पाजले. पेय प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. याच स्थितीचा फायदा घेत राजेश पवार आणि त्याचा साथीदार राजेंद्र शंकरसिंह पवार या दोघांनी पीडितेच्या संमतीशिवाय तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.

​शुद्धीवर आल्यानंतर पीडित महिलेने या अत्याचाराविरोधात धाडस दाखवत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवला. या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपी राजेश शिवराम पवार याला बेड्या ठोकल्या आहेत. दुसरा आरोपी राजेंद्र पवार याचा शोध सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश वाघ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
​

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

ताज्या बातम्या

बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न

August 3, 2026
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ

August 3, 2026
पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add