• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

उपमहापौर मनोज चौधरी यांचा पुढाकार; १६ मार्च रोजी संवादाचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 15, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी ‘कर्मचारी संवाद व जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम उद्या, सोमवार दि. १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता मनपा सभागृहात पार पडणार आहे.

​महानगरपालिकेच्या शहर विकासात कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वाटा मोठा असतो. मात्र, अनेकदा कामाचा अतिरिक्त ताण, सोयी-सुविधांचा अभाव आणि प्रशासकीय अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. विशेषतः काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच कामाचा बोजा टाकणे आणि कामचुकारांना अभय मिळणे, अशा तक्रारी कर्मचारी वर्गातून केल्या जातात. या सर्व समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी हा दरबार भरवण्यात येत आहे.

​या उपक्रमात सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना आपल्या सेवाविषयक अडचणी, कामकाजातील समस्या आणि सूचना थेट मांडता येतील. मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असे उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. तरी सर्व कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी प्रतिनिधींनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
​

Tags: #municipalcorporationJalgaon
Next Post
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add