• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

केंद्र सरकारचा 'सिम-बाइंडिंग'चा मोठा निर्णय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

​नवी दिल्ली, (विशेष वृत्त) : देशात वाढत्या सायबर फसवणुकीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने आता डिजिटल सुरक्षेचे नियम अधिक कडक केले आहेत. १ मार्च २०२६ पासून देशभरात ‘सिम-बाइंडिंग’ (Sim-Binding) हा नवीन नियम अनिवार्य करण्यात आला आहे. या नियमामुळे आता ज्या मोबाईलमध्ये प्रत्यक्ष सिम कार्ड असेल, त्याच मोबाईलवर व्हॉट्सॲप आणि इतर मेसेजिंग ॲप्स वापरता येणार आहेत.

​आतापर्यंत व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम यांसारख्या ॲप्सवर एकदा लॉग-इन केले की, फोनमधून सिम कार्ड काढून टाकले तरी इंटरनेटच्या साहाय्याने ही ॲप्स सुरू राहायची. मात्र, १ मार्चपासून हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. नव्या नियमांनुसार, जर तुमच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड नसेल, तर व्हॉट्सॲप, टेलिग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जिओचॅट आणि जोश यांसारखी लोकप्रिय मेसेजिंग ॲप्स काम करणार नाहीत.

​डेस्कटॉप वापरकर्त्यांनाही फटका..
​अनेक वापरकर्ते आपल्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर ‘व्हॉट्सॲप वेब’चा वापर करतात. नव्या नियमांनुसार, संगणकावर लॉग-इन केलेले असल्यास ते सहा तासांच्या आत आपोआप लॉग-आउट होईल. पुन्हा वापरण्यासाठी वापरकर्त्याला दरवेळी नव्याने लॉग-इन करावे लागेल. यामुळे कोणाचेही खाते त्यांच्या नकळत दुसऱ्या उपकरणावर दीर्घकाळ सुरू राहू शकणार नाही.

​सायबर गुन्हेगारीला बसणार चाप..
​सरकारचा दावा आहे की, या निर्णयामुळे सायबर फसवणूक करणाऱ्यांना शोधणे सोपे होईल. अनेकदा गुन्हेगार सिम कार्ड काढून केवळ वाय-फायच्या माध्यमातून मेसेजिंग ॲप्स वापरून गुन्हे करत असत, ज्याचा माग काढणे कठीण व्हायचे. ‘सिम-बाइंडिंग’मुळे प्रत्येक व्हॉट्सॲप खाते हे त्यातील सक्रिय सिम कार्डशी जोडलेले असेल.

​सर्व संबंधित टेक कंपन्यांना या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी केंद्र सरकारने १२० दिवसांचा वेळ दिला आहे.

Tags: #mobail#sim#whatsapp
Next Post
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

ताज्या बातम्या

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव जिल्हा

रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
जळगाव जिल्हा

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 15, 2026
जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’
मनोरंजन

जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

July 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add