• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

जैन इरिगेशनची न्यायालयीन लढाई यशस्वी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 28, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात जळगाव येथील अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. कर्नाटक येथील ‘राजेंद्र ट्रेड लिंक’ आणि तिचे दोन भागीदार मिथुन सुरेश जैन व प्रशांत प्रकाश जैन यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आरोपींना सहा महिने साधा कारावासाची शिक्षा दिली आहे. तसेच जैन इरिगेशन कंपनीला एकूण १ कोटी ८ लाख २० हजार ५८८ रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. विद्यमान कायद्यातील तरतुदीनुसार धनादेश अनादर प्रकरणात न्यायालयाकडून जलदगतीने कठोर कारवाई केली जात आहे, हे या निकालावरुन दिसून आले.

कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्यातील रनेबेन्नुर येथील राजेंद्र ट्रेड लिंक या भागीदारी संस्थेने जैन इरिगेशन कंपनीकडून घेतलेल्या मालाच्या देय रकमेपोटी ५४ लाख १० हजार २९४ रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत सादर केला असता तो अनादरीत झाला. यानंतर कंपनीने कायदेशीर नोटीस पाठवूनही आरोपींनी रक्कम अदा केली नाही. अखेर याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून निकाल दिला. न्यायालयाने दिलेल्या निकालात १ कोटी ८ लाख २० हजार ५८८ रुपये जैन इरिगेशनला देण्याचे आदेश दिले आहे. तसेच आरोपींना ६ महिने साधा कारावास शिक्षा सुनावली आहे. कायदेशीर कारवाईचा खर्च म्हणून जैन इरिगेशन कंपनीला अतिरिक्त १५ हजार रुपये देण्याचे आदेशही निकालात दिले आहे. जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने ॲड. निशांत सुशील अत्रे यांनी प्रभावीपणे न्यायालयात युक्तीवाद करून कंपनी बाजू मांडली.

कायद्याचा दणका..
धनादेश अनादर हे ‘नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, १८८१’ मधील कलम १३८ नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. यामध्ये धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट दंड आणि २ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. या निकालामुळे कायदेशीर व्यवहारात पारदर्शकता ठेवणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


 

Tags: #jainirigation#jalgaon_cityCrime
Next Post
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

'अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा'; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add