• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 15, 2026
in जळगाव जिल्हा
0
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा हैदराबाद मुक्ती संग्रामावर आधारित आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अलौकिक कार्यकर्तृत्वाची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ या ऐतिहासिक पुस्तकाचे जळगावात दिमाखात विमोचन करण्यात आले. जळगावचे माजी खासदार तथा गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील आणि भाजपच्या युवा नेत्या डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

​इतिहास अभ्यासक आणि लेखक भारत वाळके यांनी तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर या ऐतिहासिक पुस्तकाचे लेखन केले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर विविध संस्थाने खालसा करून सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कणखर नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र किंवा मध्य पाकिस्तानाचे स्वप्न पाहणाऱ्या हैदराबादच्या निजामाला त्यांनी स्वतंत्र भारतात विलीन होण्यास कसे भाग पाडले, याची रंजक आणि माहितीपूर्ण मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे.

​मराठी, तेलगू आणि कन्नड अशा तीन भाषिक प्रांतांचे अस्तित्व असलेल्या तत्कालीन हैदराबाद स्टेटची भौगोलिक व राजकीय परिस्थिती, रझाकार संघटनेने हिंदू रयतेवर केलेले अनन्वित अत्याचार, सक्तीचे धर्मांतरण आणि निजाम सरकारचे जुलमी कायदे याविरुद्ध जनतेने पुकारलेला प्रखर लढा लेखकाने अतिशय प्रभावीपणे यात रेखाटला आहे.

याच लढ्यातून पुढे भाषिक रचनेनुसार मराठी भाषिक मराठवाडा भाग महाराष्ट्रात कसा समाविष्ट झाला, यावरही यात प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही या पुस्तकात एक महत्त्वपूर्ण संदेश देऊन समाजातील इतिहास जागृतीबद्दल कळकळ व्यक्त केली आहे.

​या प्रसंगी बोलताना युवा नेत्या डॉ. केतकी पाटील म्हणाल्या, ​”आपल्या देशाचा खरा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घेणे गरजेचे आहे. देशाच्या इतिहासाचा स्वाभिमान बाळगण्यासाठी प्रत्येक राष्ट्रभक्ताने हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.”
​या सोहळ्याला राकेश वाघ, संकेत शंकपाल, गौरी जोशी, मनीषा खरात, अक्षता शंभरकर, पूजा गांजरे, प्राजक्ता बिडकर, नूतन भाले आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

एकही मतदार वंचित राहू नये'; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

ताज्या बातम्या

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add