• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बाळ अंध जन्माला आल्याच्या रागातून आईसह साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला विहिरीत ढकलले

चिमुरड्याचा मृत्यू, सासू व पती गजाआड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 14, 2026
in गुन्हे
0
बाळ अंध जन्माला आल्याच्या रागातून आईसह साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला विहिरीत ढकलले

यावल, (प्रतिनिधी) : सामाजिक अधपतनाचा आणि नात्यांना काळिमा फासणारा एक अत्यंत धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातून समोर आला आहे. दोघेही पती-पत्नी अंध असल्याने जन्माला आलेले अपत्यही अंध झाले, याच रागातून सासू आणि पतीने मिळून एका साडेतीन वर्षाच्या निष्पाप अंध बालकाला विहिरीत फेकून देऊन त्याचा खून केला, तर सुनेलाही विहिरीत ढकलून मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना किनगाव शिवारात घडली आहे. याप्रकरणी यावल पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

विहिरीच्या पूजेचे निमित्त साधून रचला कट..
दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ०८:३० वाजण्याच्या सुमारास किनगाव शिवारातील आरोपींच्या मालकीच्या शेतात ही घटना घडली. फिर्यादी सरस्वती स्वप्निल पाटील (वय २७) आणि तिचा पती स्वप्निल भागवत पाटील (वय ३४) हे दोघे विहिरीची पूजा करण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी विहिरीजवळ असताना सासू आशाबाई भागवत पाटील हिने सरस्वती आणि तिच्या साडेतीन वर्षाच्या मुलाला विहिरीत जोराचा धक्का देऊन पाडले. विहिरीत पडल्यानंतर सरस्वतीने तेथील लाकडी फाउंडेशनचा आधार घेतल्याने ती बचावली, मात्र तिचा साडेतीन वर्षाचा अंध मुलगा कृष्णा पाण्यात बुडाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सुरुवातीला ही घटना केवळ एक अपघात असल्याचा बनाव करण्यात आला होता. विहिरीत पडल्याने महिला जखमी झाली होती, तिला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला मानसिक धक्क्यामुळे तिने पोलिसांना कोणताही जबाब दिला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

परंतु, घटनेची वेळ आणि परिस्थिती संशयास्पद वाटल्याने, लहान मुलाच्या अंत्यविधीनंतर रात्री उशिरा पोलिसांनी जखमी महिलेची सखोल विचारपूस केली. यावेळी महिलेने तिच्यासोबत घडलेला हा क्रूर प्रकार पोलिसांसमोर मांडला. सासूने विहिरीत ढकलले आणि त्यात पतीचाही सहभाग असल्याची तक्रार तिने नोंदवली.

या घटनेमागील कारण अत्यंत वेदनादायी आहे. फिर्यादी सरस्वती ही ७०% अंध असून तिचा पती स्वप्निल हा १००% अंध आहे. गर्भधारणेदरम्यान सोनोग्राफीमध्ये होणारे बाळही अंध असेल असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे आरोपी पती हा गर्भपात करण्यासाठी दबाव आणत होता. मात्र, सरस्वतीने हट्ट धरून बाळाला जन्म दिला. याच कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत होते आणि यामुळेच सरस्वती गेल्या अडीच वर्षांपासून तिच्या माहेरी राहत होती. शेवटी याच वादाचा अंत या दुर्दैवी घटनेने झाला.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने तात्परतेने कारवाई करत आरोपी पती स्वप्निल भागवत पाटील आणि सासू आशाबाई भागवत पाटील यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.


 

Next Post
जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

ताज्या बातम्या

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
खान्देश

जि.प.च्या १५ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add