• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 14, 2026
in मनोरंजन
0
जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

​जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ‘परिवर्तन’च्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ निमित्त सुप्रसिद्ध कवी व गीतकार मंगेश पाडगावकर यांच्या कविता आणि गाण्यांवर आधारित “तुझे गीत गाण्यासाठी…” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम बुधवार, १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता महाबळ रोडवरील भाऊंच्या उद्यानापुढे, हतनूर सभागृहाजवळ असलेल्या ‘अभियंता भवन’ येथे संपन्न होणार आहे.

​महाकवी कालिदास यांच्या ‘मेघदूत’ काव्य लेखनाचा प्रारंभीचा दिवस देशभर ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हणजेच ‘कवितेचा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जळगाव शहरातील ‘परिवर्तन’ संस्था गेल्या २५ वर्षांपासून मराठी भाषेतील विविध नामवंत कवींच्या साहित्याचा जागर करत आली आहे. यापूर्वी संस्थेने अरुण कोलटकर, ना. धों. महानोर, बहिणाबाई, भालचंद्र नेमाडे, गुलजार आणि खानदेशी कवितांवर आधारित दर्जेदार कार्यक्रम सादर केले आहेत. यंदा पाडगावकरांच्या अजरामर रचनांनी ही सांध्यकाळ न्हाऊन निघणार आहे.

​डॉ. किशोर पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचे दिग्दर्शन डॉ. मनोज पाटील यांनी केले आहे. निर्मिती प्रमुख म्हणून श्वेता गरुड व समृद्धी पाटील जबाबदारी सांभाळत आहेत. कार्यक्रमात अंजली धुमाळ, अक्षय नेहे, लीना लेले, आणि मानसी गगडाणी हे कलावंत पाडगावकरांचे काव्य सादर करणार असून, हर्षल पाटील कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

​हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य व खुला असून, जळगावकर रसिकांनी या काव्यमय सादरीकरणाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन परिवर्तनचे कार्याध्यक्ष नारायण बाविस्कर आणि उपाध्यक्ष मंजुषा भिडे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’
मनोरंजन

जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

July 14, 2026
बाळ अंध जन्माला आल्याच्या रागातून आईसह साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला विहिरीत ढकलले
गुन्हे

बाळ अंध जन्माला आल्याच्या रागातून आईसह साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला विहिरीत ढकलले

July 14, 2026
ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा
गुन्हे

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

July 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add