• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

देशभरातील २७५ प्राध्यापक, संशोधक व तज्ज्ञांचा उत्स्फूर्त सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 15, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त संस्था), विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत आयोजित “इलेक्ट्रिक वाहनांचे तंत्रज्ञान आणि सहाय्यक प्रणाली” या विषयावरील पाच दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचा उत्साहात समारोप करण्यात आला.

ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला देशभरातील विविध राज्यांतील २७५ प्राध्यापक, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

पाच दिवस चाललेल्या या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, चार्जिंग प्रणाली, स्मार्ट ग्रिड, ऊर्जा साठवणूक, सौर ऊर्जेवर आधारित ईव्ही चार्जिंग, फ्युएल सेल तंत्रज्ञान, गणितीय मॉडेलिंग आणि ऑप्टिमायझेशन अशा अत्याधुनिक विषयांवर देशातील नामवंत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

पहिल्या दिवशी डॉ. पी. व्ही. व्ही. रामाराव यांनी चार्जिंग तंत्रज्ञान तर डॉ. एन. एम. जी. कुमार इव्ही वाहनांच्या विश्वासार्हतेचे मुल्यांकन दुसर्‍या दिवशी डॉ. वरप्रसाद जनामला यांनी स्मार्ट ग्रिड वातावरणात व्हेईकल टू ग्रिड ऑपरेशन, डॉ. बी. काव्या संतोषी यांनी शाश्वत वाहतुकीसाठी बुद्धिमान सौर ईव्ही चार्जिंग प्रणाली आधुनिक संकल्पना मांडल्या.

तिसर्‍या दिवशी डॉ. सुदर्शन एल. चव्हाण यांनी पीईएम इंधन सेल इलेक्ट्रिक वाहनांत ग्राफीन आधारित नॅनो-कॉम्पोझिट मटेरियलच्या वापराविषयी, डॉ. वरप्रसाद जनामला यांनी स्मार्ट ग्रिडच्या कार्यासाठी फ्युएल सेल इलेक्ट्रिक वाहनाच्या ऊर्जा साठवण प्रणालीची रचनावर मार्गदर्शन केले. चौथ्या दिवशी प्रा. के. वैसाख यांनी ईव्ही तंत्रज्ञानातील इष्टतमीकरण, डॉ. हेमचंद्र जी. यांनी इलेक्ट्रिक वाहनांचे गणितीय प्रारूपण वरील तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या.

अंतिम दिवशी प्रा. के. वैसाख यांनी ईव्ही ऑप्टिमायझेशनसाठी सॉफ्ट कम्प्युटिंग पद्धती, डॉ. हेमचंद्र जी. यांनी मॅटलॅब/सायलॅब आधारित प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सत्र घेऊन सहभागी प्राध्यापकांना आधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांचे मॉडेलिंग व विश्लेषणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. महेश एच. पाटील तर समन्वयक डॉ. सचिन आर. महेश्री यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. हर्षल मयूर पाटील यांनी केले.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्युत अभियांत्रिकी विभागाचे अभिनंदन करून अशा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये संशोधनाभिमुख दृष्टीकोन विकसित होण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
जळगाव जिल्हा

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 15, 2026
जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’
मनोरंजन

जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

July 14, 2026
बाळ अंध जन्माला आल्याच्या रागातून आईसह साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला विहिरीत ढकलले
गुन्हे

बाळ अंध जन्माला आल्याच्या रागातून आईसह साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला विहिरीत ढकलले

July 14, 2026
ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add