• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 15, 2026
in जळगाव जिल्हा
0
रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील कॅटरिंग व्यवसायाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता २१ जुलै २०२६ पासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात रात्री १ वाजेनंतर कोणत्याही प्रकारची कॅटरिंग सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’च्या वतीने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, यामुळे जिल्ह्यातील हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कामगारांचे आरोग्य आणि वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाऊल..
गेल्या काही काळापासून लग्न कार्ये आणि इतर समारंभांमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याने कॅटरिंग कामगारांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत होता. उशिरापर्यंत काम संपवून अवघ्या काही तासांत, म्हणजेच सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा कामावर हजर व्हावे लागत असल्याने कामगारांची झोप पूर्ण होत नव्हती. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे रात्रीच्या वेळी कामगारांचे अपघात होण्याचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले होते. या गंभीर बाबींची दखल घेत असोसिएशनने हा कठोर नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

१२ जुलै रोजी येथील ओक मंगल कार्यालयात खानदेश कॅटरिंग असोसिएशनची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून कॅटरिंग व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या संमतीने हा नवा नियम २१ जुलै २०२६ पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रतन सारस्वत यांनी दिली. या महत्त्वपूर्ण बैठकीला असोसिएशनचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि मार्गदर्शक उपस्थित होते.

यामध्ये जिल्हाध्यक्ष रतन सारस्वत, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश टाटिया, जळगाव शहर अध्यक्ष सत्यनारायण जोशी, शहर उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव महेंद्र टाडा, खजिनदार गोपाल व्यास, मुख्य सल्लागार राजेंद्र वैष्णव यांच्यासह रामचंद्र टाडा, मेघराज महाराज, गोवर्धन गुर्जर, दुर्गेश सारस्वत, शिव अग्याल, भवर व्यास, मदन पुरोहित, मदन वैष्णव, बबलु महाराज, मोहन महाराज, शिवा तिवारी, ओम् प्रजापत, केदार शर्मा, गुलाब महाराज आणि जिल्ह्यातील इतर सर्व प्रमुख कॅटरिंग व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नव्या नियमामुळे आता जिल्ह्यातील लग्नकार्ये आणि सोहळ्यांच्या नियोजनातही बदल करावा लागणार असून, कामगारांच्या आरोग्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

ताज्या बातम्या

रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव जिल्हा

रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
जळगाव जिल्हा

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 15, 2026
जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’
मनोरंजन

जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

July 14, 2026
बाळ अंध जन्माला आल्याच्या रागातून आईसह साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला विहिरीत ढकलले
गुन्हे

बाळ अंध जन्माला आल्याच्या रागातून आईसह साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला विहिरीत ढकलले

July 14, 2026
ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add