• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दारूच्या व्यसनाने घेतला मुलाचा बळी: जामनेरमध्ये वडिलांनीच संपवले २५ वर्षीय मुलाला

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 23, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दारूच्या व्यसनाने घेतला मुलाचा बळी: जामनेरमध्ये वडिलांनीच संपवले २५ वर्षीय मुलाला

जामनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कसबा पिंप्री येथे दारूच्या व्यसनापायी कुटुंबाला त्रास देणाऱ्या २५ वर्षीय मुलाचा वडिलांनी डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि फत्तेपूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

कसबा पिंप्री येथील शुभम धनराज सुरडकर (वय २५) याचा मृतदेह गावापासून एक किलोमीटर अंतरावर शेख करीम शेख रऊफ यांच्या शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला आढळून आला. सकाळी धावण्यासाठी गेलेल्या काही तरुणांना हा मृतदेह दिसला, त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस पाटील समद तडवी यांना माहिती दिली. त्यांनी फत्तेपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची पाहणी केली असता, शुभमच्या डोक्यावर कठीण वस्तूने मारहाण झाल्याचे आणि मृतदेह नंतर येथे आणून टाकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. एलसीबीने तपास सुरू करून शुभमच्या घरी धाव घेतली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घरातील चटई उचलल्यानंतर जमिनीवर रक्ताचे डाग आढळले. शुभमचे वडील धनराज सुपडू सुरडकर (वय ४५) यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमला दारूचे व्यसन होते आणि तो आई-वडील, भाऊ-बहीण आणि पत्नीला वारंवार त्रास देऊन भांडणे करत असे. त्याच्या त्रासाला कुटुंबीय कंटाळले होते, इतकेच नाही तर त्याची पत्नीही घर सोडून गेली होती. २१ जून रोजी रात्री शुभमने दारू पिऊन घरात पुन्हा वाद घातला आणि हाताने काच फोडला. शुभम घरात झोपलेला असताना, वडील धनराज यांनी रागाच्या भरात त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकला. खुनानंतर, धनराज यांनी मुलाचा मृतदेह हलवण्यासाठी आपला दुसरा मुलगा गौरव धनराज सुरडकर आणि भाऊ हिरालाल सुपडू सुरडकर यांना बोलावून घेतले. तिघांनी मिळून शुभमचा मृतदेह त्यांच्या चारचाकी वाहनातून पिंपळगाव चौखांबे गावाच्या रस्त्यावर टाकून दिला आणि घरी परत आले.

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपींना फत्तेपूर पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे (पाचोरा उपविभाग) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, फत्तेपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अंकुश जाधव, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे आणि इतर पोलीस अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास फत्तेपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अंकुश जाधव करत आहेत.

 


 

Tags: CrimeJamnerPolice
Next Post
ग्रामसेवक आणि रोजगार सेवक लाच घेताना रंगेहात जेरबंद; घरकुल हप्त्यासाठी मागितली लाच

ग्रामसेवक आणि रोजगार सेवक लाच घेताना रंगेहात जेरबंद; घरकुल हप्त्यासाठी मागितली लाच

ताज्या बातम्या

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!
खान्देश

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

December 2, 2025
यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!
खान्देश

यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!

December 2, 2025
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!
खान्देश

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

December 2, 2025
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
खान्देश

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

December 2, 2025
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

December 1, 2025
कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!
खान्देश

कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!

December 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group