मुंबई, (प्रतिनिधी) : मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवारी निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांनी मराठी रंगभूमी, मराठी, हिंदी चित्रपट या क्षेत्रात अनेक अभिनेते, दिग्दर्शक, कलाकारांसह काम केले. कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या नाटकातील त्यांच्या भूमिका गाजलेल्या आहेत.
त्यांना कर्करोग झाला होता. त्यावर मात करुनही काही महिन्यांपासून त्यांची तब्येत पुन्हा बिघडली होती. तब्येतीने त्यांना साथ दिली नाही. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अतिशय कमी वयात अतुल परचुरे यांचे निधन झाल्यामुळे नाट्य आणि चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे.