• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हळदी समारंभात ‘गावठी कट्टा’ घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 5, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
हळदी समारंभात ‘गावठी कट्टा’ घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

​जळगाव, (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील ताडे येथे एका हळदी समारंभाच्या कार्यक्रमात कमरेला गावठी कट्टा (अग्निशस्त्र) लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला कासोदा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ३ मे २०२६ रोजी ताडे (ता. एरंडोल) येथे एका हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून अनेक पाहुणे आले होते. रात्री ११:३० वाजेच्या सुमारास बँडच्या तालावर नाचत असताना, लखन प्रकाश वाघ (रा. परधाडे, ता. पाचोरा) या तरुणाच्या कमरेला गावठी कट्टा लावलेला काही नागरिकांना दिसून आला. याबाबत उपस्थित लोकांनी विचारणा केली असता, गर्दीचा फायदा घेऊन लखन वाघ तिथून पसार झाला.

या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस स्टेशनचे पथक सक्रिय झाले. दरम्यान, ५ मे २०२६ रोजी पोलीस तपासात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संशयित आरोपी लखन वाघ हा पुन्हा गुन्हे करण्याच्या उद्देशाने ताडे गावात गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. सपोनि श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ भातखेडे चौफुली येथे सापळा रचला. पोलिसांनी लखन वाघ याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी कट्टा (पिस्तूल) आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हे मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

​ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि श्रीकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस कर्मचारी निलेश गायकवाड, योगेश पाटील आणि सोनू पाचुंदे यांच्या पथकाने केली आहे.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

ताज्या बातम्या

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add