• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उपमहापौर मनोज चौधरी यांनी घेतला डम्पिंग ग्राऊंडच्या कामाचा आढावा; ठेकेदारांकडून कामाला गती देण्याचे आश्वासन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 5, 2026
in जळगाव जिल्हा
0
उपमहापौर मनोज चौधरी यांनी घेतला डम्पिंग ग्राऊंडच्या कामाचा आढावा; ठेकेदारांकडून कामाला गती देण्याचे आश्वासन

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहराच्या जिव्हाळ्याचा आणि आरोग्याचा प्रश्न असलेल्या कचरा डेपोच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती मिळाली असून, येत्या सहा महिन्यांत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उपमहापौर मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज डम्पिंग ग्राऊंडच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ठेकेदारांनी प्रकल्पाच्या कालमर्यादेबाबत प्रशासनाला महत्त्वपूर्ण ग्वाही दिली.

​कचरा डेपोच्या प्रलंबित कामांबाबत नागरिकांमध्ये असलेल्या तक्रारींची दखल घेत उपमहापौरांनी या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी श्री श्री इन्फ्रा स्ट्रक्चरचे आदित्य खटोड, पुणे येथील रॉयल वेस्टर्नचे प्रोजेक्ट मॅनेजर विशाल पाटील आणि शाखा अभियंता प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत प्रकल्पाच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित ठेकेदारांनी प्रशासनाला माहिती दिली की, कचरा डेपोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून ते युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या ३ ते ४ महिन्यांत कचरा डेपोचे काम तांत्रिकदृष्ट्या पूर्ण होईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसेच, संपूर्ण प्रोजेक्ट ६ महिन्यांच्या आत कार्यान्वित केला जाईल, असे नियोजन बैठकीत मांडण्यात आले.

कामाच्या ओघात कोणतेही तांत्रिक किंवा इतर स्वरूपाचे अडथळे येणार नाहीत, याची पूर्ण खबरदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी, अशा सूचना उपमहापौरांनी दिल्या. कामाचा वेग कायम राखल्यास शहराचा कचरा विल्हेवाटीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Tags: #jalgaon_city#municipalcorporation
Next Post
पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा उत्साह; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न

पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा उत्साह; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न

ताज्या बातम्या

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
आरोग्य

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश
आरोग्य

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश

June 26, 2026
रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत

June 26, 2026
बंडखोर खासदारांच्या फोटोंना जोडे मारून जळगावात ठाकरे गटाचा तीव्र निषेध
जळगाव जिल्हा

बंडखोर खासदारांच्या फोटोंना जोडे मारून जळगावात ठाकरे गटाचा तीव्र निषेध

June 26, 2026
रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!
क्रिडा

रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!

June 26, 2026
मेहरूण तलाव परिसरात दहशत निर्माण करणारा गुन्हेगार पिस्तूलासह अटकेत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
गुन्हे

मेहरूण तलाव परिसरात दहशत निर्माण करणारा गुन्हेगार पिस्तूलासह अटकेत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

June 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group