• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्र; ​जात वैधता प्रमाणपत्र अवैध

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 5, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्र; ​जात वैधता प्रमाणपत्र अवैध

​जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री रूपचंद गौर ऊर्फ गायत्री चेतन भंगाळे यांना नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. राज्य नगरविकास विभागाने यासंदर्भातील अंतिम आदेश सोमवारी जारी केले असून, २३ एप्रिल २०२६ पासून त्यांना भूतलक्षी प्रभावाने अपात्र घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

​प्रकरणाची पार्श्वभूमी:
गायत्री भंगाळे यांनी अनुसूचित जाती (SC) प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवून विजय मिळवला होता. मात्र, त्यांच्या या प्रमाणपत्रावर रजनी सावकारे, प्रमोद सावकारे, राहुल तायडे आणि संजय तायडे यांनी आक्षेप घेत जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती.

​अपात्रतेचे मुख्य कारण:
सुनावणीदरम्यान तक्रारदारांनी पुराव्यासह असा दावा केला की, गायत्री भंगाळे यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील महोबा असून त्यांच्या वडिलांच्या व काकांच्या शालेय नोंदीत ‘कुर्मी’ अशी जात नमूद आहे. नियमानुसार, स्थलांतरित व्यक्तींना दुसऱ्या राज्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. या पुराव्यांच्या आधारे जात पडताळणी समितीने २३ एप्रिल रोजी त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या निर्णयावर आधारित जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या प्रस्तावानुसार आता नगरविकास विभागाने त्यांच्या निवडीस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

▪️”आम्हाला अद्याप कोणताही अधिकृत शासकीय आदेश मिळालेला नाही. या निर्णयाविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली असून ५ मे रोजी सुनावणी होणार आहे. आम्ही न्यायालयीन लढा देण्यास सज्ज आहोत.”
गायत्री भंगाळे, नगराध्यक्षा, भुसावळ
​


 

Next Post
ग्वालियर येथील ‘आयडीई बुटकॅम्प’मध्ये जळगावच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

ग्वालियर येथील 'आयडीई बुटकॅम्प'मध्ये जळगावच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

ताज्या बातम्या

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add