• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव सी.ए. शाखेत ३ दिवसीय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ कोर्स संपन्न; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 4, 2026
in शैक्षणिक
0
जळगाव सी.ए. शाखेत ३ दिवसीय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ कोर्स संपन्न; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

​जळगाव, (प्रतिनिधी) : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (ICAI) जळगाव शाखेमार्फत आयोजित तीन दिवसीय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI CA) लेव्हल १ सर्टीफिकेशन कोर्स’ नुकताच यशस्वीरित्या संपन्न झाला. १ ते ३ मे २०२६ दरम्यान चाललेल्या या प्रशिक्षणात जळगाव व परिसरातील ६० हून अधिक सी.ए. सभासदांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

​आजच्या डिजिटल युगात चार्टर्ड अकाउंटंट्सनी नवीन तंत्रज्ञानाशी सुसंगत राहणे आवश्यक असल्याचे सांगत, शाखेचे अध्यक्ष सी.ए. रोशन रुणवाल यांनी प्रास्ताविकात या कोर्सचे महत्त्व विशद केले. “एआय हे भविष्यातील प्रभावी साधन असून यामुळे व्यावसायिक कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ​या तीन दिवसीय प्रशिक्षणासाठी नाशिकचे सी.ए. राहुल बजाज, नागपूरचे सी.ए. शुभम पटेल व सी.ए. राघव मुंदडा यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.

​पहिल्या दिवशी सी.ए. राहुल बजाज यांनी एआयची मूलभूत संकल्पना आणि ऑडिट क्षेत्रातील वापराबाबत मार्गदर्शन केले. तर ​दुसऱ्या दिवशी सी.ए. शुभम पटेल यांनी प्रगत एआय टूल्स, ऑटोमेशन आणि डेटा ॲनालिटिक्सचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. आणि ​तिसऱ्या दिवशी सी.ए. राघव मुंदडा यांनी रिअल-लाईफ केस स्टडीज आणि दैनंदिन कामात एआय ॲप्लिकेशन्सचा समावेश कसा करावा, यावर सविस्तर भाष्य केले.

​प्रत्यक्ष सराव आणि प्रश्नोत्तरांच्या सत्रांमुळे सहभागी सभासदांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या उपक्रमामुळे जळगावातील सी.ए. व्यावसायिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख झाली असून, त्यांच्या व्यावसायिक गुणवत्तेत भर पडणार आहे.

Tags: #aducetion
Next Post
पांढऱ्या काविळीचे संकट हरले, डॉक्टरांच्या जिद्दीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी

पांढऱ्या काविळीचे संकट हरले, डॉक्टरांच्या जिद्दीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी

ताज्या बातम्या

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add