• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पांढऱ्या काविळीचे संकट हरले, डॉक्टरांच्या जिद्दीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील नेत्रतज्ज्ञांनी स्विकारले आव्हान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 4, 2026
in आरोग्य
0
पांढऱ्या काविळीचे संकट हरले, डॉक्टरांच्या जिद्दीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी

जळगाव, (प्रतिनिधी) : पांढरा कावीळ (हिपॅटायटीस बी) या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या दोन वयोवृद्ध रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इतर ठिकाणी उपचाराबाबत निराशा मिळालेल्या या रुग्णांना येथे नवजीवन मिळाले आहे.

याबाबत माहिती अशी की, दोन्ही रुग्णांना पांढर्‍या कावीळमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाली होती. त्याचबरोबर डोळ्यांत मोतीबिंदू आल्यामुळे त्यांची दृष्टी धुसर झाली होती. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत जोखमीचे मानले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता. मात्र डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील अनुभवी नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील यांनी शिबिरात रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांची वैद्यकीय स्थिती काळजीपूर्वक अभ्यासली. आवश्यक ती पूर्वतयारी, विशेष खबरदारी आणि योग्य नियोजन करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दोन्ही रुग्णांवर यशस्वीरीत्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पाडली.शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या दृष्टीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. उपचारानंतर रुग्णांनी समाधान व्यक्त करत डॉक्टरांचे आभार मानले. डॉ उर्मी गायकवाड, डॉ. गौरव पाटील, डॉ. प्रिया गोरे, डॉ. अभिजित, प्रतिक्षा सिस्टर शस्त्रक्रियेसाठी यांचे सहकार्य लाभले.

▪️पांढर्‍या कावीळ असलेल्या रुग्णांवर कोणतीही शस्त्रक्रिया करणे हे आव्हानात्मक असते. मात्र योग्य तपासणी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि अत्याधुनिक सुविधा यांच्या मदतीने अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीतही यश मिळवता येते. रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळणे महत्त्वाचे आहे, असे मत संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.
– नितु पाटील, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

Next Post
शस्त्रास्त्र तस्करी अन् अवैध वाहतुकीला ‘ब्रेक’; जळगाव पोलिसांची रात्रीची धडक कारवाई; ७० बसेसची तपासणी

शस्त्रास्त्र तस्करी अन् अवैध वाहतुकीला 'ब्रेक'; जळगाव पोलिसांची रात्रीची धडक कारवाई; ७० बसेसची तपासणी

ताज्या बातम्या

अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add