• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जेडीसीसी बँक निवडणुकीतील अर्जांच्या घोळाची चौकशी करा; निवडणूक प्रक्रिया स्थगितची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचीही मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 25, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
जेडीसीसी बँक निवडणुकीतील अर्जांच्या घोळाची चौकशी करा; निवडणूक प्रक्रिया स्थगितची मागणी

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते अर्ज माघारीपर्यंतच्या प्रक्रियेत राजकीय दबावाचा वापर झाल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीने निवडणूक प्रक्रियेच्या चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निलंबित करून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय दबाव व दडपशाहीचे तंत्र वापरल्याचा आरोप आहे. अनेक निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे अर्ज अधिकाऱ्यांवर दबाव आणून नामंजूर करण्यात आल्याचा दावा आघाडीने केला आहे.

एका उमेदवाराचा अर्ज जळगाव येथे नामंजूर करण्यात आला होता. मात्र, संबंधित उमेदवाराने नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अपील केल्यानंतर त्याचा अर्ज मंजूर करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती चाळीसगाव येथील आमदारांनी युतीच्या मेळाव्यात प्रसारमाध्यमांसमोर दिल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.

सत्ताधारी पक्षातील आमदार व मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांवर दबाव आणून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोपही महाविकास आघाडीने केला आहे. तसेच पैसा, सत्ता आणि बळाचा वापर करून अनेक जागा बिनविरोध करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. उर्वरित नऊ जागांसाठीही मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखविणे आणि दादागिरीचे प्रकार सुरू असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीपासून माघारीपर्यंत झालेल्या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

यावेळी अशोक लाडवंजारी, राजू मोरे, अमोल कोल्हे, किरण राजपूत, सुनील भैय्या माळी, गिरीश सांगळे, गणेश पाटील, राहुल भालेराव, रफीक पटेल, सुहास चौधरी, अबजेत खाटीक, इब्राहिम खान यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


 

ताज्या बातम्या

जेडीसीसी बँक निवडणुकीतील अर्जांच्या घोळाची चौकशी करा; निवडणूक प्रक्रिया स्थगितची मागणी
खान्देश

जेडीसीसी बँक निवडणुकीतील अर्जांच्या घोळाची चौकशी करा; निवडणूक प्रक्रिया स्थगितची मागणी

November 25, 2026
जळगावच्या पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले; तिघांचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता
खान्देश

जळगावच्या पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले; तिघांचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता

November 25, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
खान्देश

कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ

November 25, 2026
अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास
गुन्हे

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास

November 25, 2026
कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!
जळगाव जिल्हा

कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

November 25, 2026
ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई
क्रिडा

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

November 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add