चाळीसगाव, (प्रतिनिधी) : शहरातील हनुमान वाडी परिसरात एका संशयास्पद वाहनाची तपासणी केली असताना त्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा व तंबाखूची वाहतूक होत असल्यासचे दिसून आले. पोलीसांनी वाहनासह मुद्देमाल जप्त केला आहे. त्याप्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी पोलीसांनी पेट्रोलींग करत असतांना सउद अहमद गुलाब दस्तगीर अंसारी रा. नागर दरवाजा रोड, येवला, जिल्हा नाशिक आणि सईद ताहीरअन्सारी रा. मोमीनपुरा, येवला या दोघांचे वाहन अडविले. वाहनाची तपासणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गुटखा आणि तंबाखूचा साठा आढळून आला.
चाळीसगाव शहर पोलिसांनी अनधिकृत गुटखा आणि तंबाखू जप्त करून कारवाई केली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सउद अहमद गुलाब दस्तगीर अंसारी (रा. नागर दरवाजा रोड, येवला जिल्हा नाशिक), सईद ताहीर अन्सारी (रा. मोमीनपुरा, येवला) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील, पोलीस हवालदार योगेश बेलदार, नितीन वाल्हे, रमेश पाटील, निलेश पाटील, शरद पाटील, दीपक चौधरी यांनी केली आहे.