• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 1, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

​जळगाव, (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढवणाऱ्या जळगाव विधान परिषद निवडणुकीचा सस्पेन्स अखेर संपला आहे. या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून रावेर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरा भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी नंदकिशोर महाजन यांच्यासह राज्यातील एकूण ११ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली.

​जळगावच्या या जागेसाठी महायुतीमधील भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात मोठी रस्सीखेच सुरू होती. दोन्ही बाजूंकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात असल्याने ही जागा कोणाच्या पदरात पडणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, सर्व चर्चांना पूर्णविराम देत अखेर ही जागा भाजपने आपल्याकडेच राखण्यात यश मिळवले आहे.

उमेदवारी मिळालेले नंदकिशोर महाजन हे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू मानले जातात, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी नंदकिशोर महाजन आज, सोमवारी आपल्या समर्थकांसह अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

​भाजपच्या ११ उमेदवारांची संपूर्ण यादी:
​जळगाव: नंदकिशोर महाजन
​नागपूर: डॉ. राजीव पोतदार
​वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली: अरुण लखाणी
​भंडारा-गोंदिया: अविनाश ब्राह्मणकर
​अमरावती: प्रवीण पोटे-पाटील
​सांगली-सातारा: धैर्यशील कदम
​सोलापूर: राजेंद्र राऊत
​अहिल्यानगर: प्राजक्त तनपुरे
​छत्रपती संभाजीनगर-जालना: सुहास शिरसाट
​नांदेड: अमर राजूरकर
​धाराशिव-लातूर-बीड: बसवराज पाटील

​नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीमुळे जळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आता या निवडणुकीतील पुढील घडामोडींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tags: #politicalBjp
Next Post
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add