• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या यावलमधील दोघे हद्दपार

मोबाईल, रोकड चोरीसह जबरी चोरीचे गुन्हे; सहा महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 29, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या यावलमधील दोघे हद्दपार

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या यावलमधील दोघे हद्दपार

मोबाईल, रोकड चोरीसह जबरी चोरीचे गुन्हे; सहा महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेर

जळगाव प्रतिनिधी : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल आणि रोकड चोरणे, नागरिकांना अडवून मौल्यवान वस्तू जबरीने हिसकावणे तसेच मारहाण करून दहशत निर्माण करण्याच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या यावल येथील दोघांना जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. समशेर शहा सलीम शहा (वय २८, रा. बाहेरपुरा, यावल) आणि समीर उर्फ भांजा रहेमान तडवी (वय २३, रा. तडवी कॉलनी, यावल) अशी हद्दपार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही कारवाई केली.

भुसावळ आणि यावल शहर परिसरात दोघांनी टोळी तयार करून गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्याचा आरोप आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल व पैसे चोरणे, नागरिकांना अडवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू जबरीने हिसकावणे, महिलांचा विनयभंग करणे तसेच मारहाण करून परिसरात दहशत निर्माण करणे, अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्याविरुद्ध दाखल आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही वर्तनात सुधारणा होत नसल्याने यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दोघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी करण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दोघांना सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे.


 

Next Post
कार झाडावर झालेल्या अपघातात शिवसेना कार्यकर्त्याचा मृत्यू ; बिल्दी धरणाजवळील घटना 

कार झाडावर झालेल्या अपघातात शिवसेना कार्यकर्त्याचा मृत्यू ; बिल्दी धरणाजवळील घटना 

ताज्या बातम्या

कार झाडावर झालेल्या अपघातात शिवसेना कार्यकर्त्याचा मृत्यू ; बिल्दी धरणाजवळील घटना 
खान्देश

कार झाडावर झालेल्या अपघातात शिवसेना कार्यकर्त्याचा मृत्यू ; बिल्दी धरणाजवळील घटना 

November 29, 2026
रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या यावलमधील दोघे हद्दपार
खान्देश

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या यावलमधील दोघे हद्दपार

November 29, 2026
एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना
गुन्हे

एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना

November 28, 2026
रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी

November 27, 2026
बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
खान्देश

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

November 27, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add