• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 31, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

​जळगाव, (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्रीराम प्रभू ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गावातील आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस सामूहिकरीत्या साजरा करण्याचा एक स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक साईबाबा मंदिरात करण्यात आले होते, जेथे अतिशय उत्साही वातावरणात पाच ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

​या सोहळ्यात वसंत आनंदा पाटील, अशोक शामराव वंजारी, श्रीमती शोभाबाई वंजारी, कल्पनाबाई ढाकणे आणि वासुदेव विठ्ठल सानप या ज्येष्ठ नागरिकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक प्रशांत नाईक होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक सिताराम लाडवंजारी व सुनील वसंत वंजारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमांमुळे समाजात आपुलकीची भावना निर्माण होऊन सामाजिक ऐक्य अधिक मजबूत होते.”

​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रभू ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिलीप लाडवंजारी, उपाध्यक्ष सोमनाथ सानप यांच्यासह रवींद्र सानप, उत्तमराव नेरकर, दत्तात्रय लाड, विनोद पाटील, भास्कर वंजारी, निवृत्ती महाजन, रवींद्र तायडे, अनिल महाजन, सुनील भालेराव, बाबुराव वाघ, गोविंदा वाघ, भास्कर महाजन, श्रीमती पुष्पाताई घुगे, भास्कर वाणी, अनिल चाटे, गजानन लाडवंजारी, अमर लाडवंजारी, नितीन चाटे, रघुनाथ कोल्हटकर आणि नारायण वाघ आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

​या कार्यक्रमाला मेहरुण परिसरातील ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, तसेच निरोगी व आनंदी जीवनासाठी मनभरून सदिच्छा व्यक्त केल्या.


 

Next Post
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

ताज्या बातम्या

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी
जळगाव जिल्हा

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

October 21, 2026
प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी
गुन्हे

प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी

October 21, 2026
गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
गुन्हे

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

October 21, 2026
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add