जळगाव सायबर पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : तरुणाला शेअर ट्रेण्डिंगचे आमिष दाखून त्याची तब्बल ४० लाख रुपयांत फसवणूक करणाऱ्या संशयित तरुणाला हरियाणा राज्यातून जळगावच्या सायबर पोलीस स्टेशनने अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
भुसावळ शहरातील राकेश पांडे यांना शेअर ट्रेण्डिंगचे आमिष दाखवून वेळोवेळी ४० लाख रुपये घेऊन अज्ञात आरोपींची फसवणूक केली होती. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला दि. १४ मार्च २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. (केसीएन)याप्रकरणी तपास सुरु होता. दरम्यान, संशयित आरोपीची पोलिसांना माहिती मिळाली. संशयित समीम लियाकतअली मोहम्मदपूर (वय २८, रा. कटरा बाजार ता. कर्नलगंज जि. गोंडा, उत्तर प्रदेश) हा हरियाणा राज्यातील फरिदाबाद येथे पोलीस कोठडीत होता. तेथून त्याला ताब्यात घेऊन जळगाव येथे आणण्यात आले.
सदर संशयित समीम लियाकत अली याने फरिदाबाद येथे ५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे. यापूर्वी त्याने अनेक सायबर गंडे घातल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. सदर कारवाई निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ प्रशांत साळी, हेकॉ हेमंत माळी, अरविंद वानखेडे, नितीन भालेराव यांनी केली आहे.