• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; आगीत मोठे नुकसान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 2, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; आगीत मोठे नुकसान

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहराच्या औद्योगिक वसाहतीमधील ‘जे’ सेक्टरमध्ये शनिवारी दुपारी आगीचे तांडव पाहायला मिळाले. भारत गॅस गोदामासमोर असलेल्या ‘जे ब्रदर्स’ आणि ‘श्री एंटरप्रायझेस’ या दोन कंपन्यांना अचानक लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधींचे साहित्य जळून खाक झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की, शहराच्या विविध भागांतून धुराचे लोट दिसत होते, तर स्फोटांच्या आवाजांनी परिसरात प्रचंड घबराट पसरली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या सुमारास ही आग लागली. ‘जे ब्रदर्स’ कंपनीत सुगंधी व खोबरेल तेलाचे पॅकिंग होते, तर ‘श्री एंटरप्रायझेस’मध्ये प्लास्टिक चटयांचे उत्पादन चालते. दोन्ही ठिकाणी तेल आणि प्लास्टिक यांसारख्या अत्यंत ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. तेलाचे डबे आणि रसायनांच्या पिंपांचा स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2026/05/VID-20260502-WA0057.mp4

​घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे ६ हून अधिक बंब तैनात करण्यात आले होते. समोरच असलेल्या भारत गॅस गोदामातूनही पाण्याचा पुरवठा करून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.


​या आगीत दोन्ही कंपन्यांमधील कच्चा माल, महागडी यंत्रसामग्री आणि तयार साठा पूर्णपणे जळून राख झाला आहे. यामुळे कोट्यवधींच्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. उष्णतेची लाट किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असला तरी, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
​


 

Tags: #fireJalgaon
Next Post
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा 'जिल्हा युवा पुरस्कारा'ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

ताज्या बातम्या

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add