• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. अनिल पाटलांचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

जिल्ह्यातून थेट निवडणुकीद्वारे निवडून जाणारे पहिलेच सदस्य ठरण्याच मान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 30, 2026
in जळगाव जिल्हा
0
डॉ. अनिल पाटलांचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्वाचा डंका आता राज्यस्तरावर घुमला आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२६ मध्ये जळगावचे सुप्रसिद्ध युरो सर्जन आणि गायत्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनिल भास्कर पाटील यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील दीड ते पावणेदोन लाख डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणार्‍या या निवडणुकीत डॉ. पाटील यांनी राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या इतिहासात जळगाव जिल्ह्यातून थेट निवडणुकीद्वारे निवडून जाणारे ते पहिलेच सदस्य ठरले आहेत.

गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वपूर्ण आदेशानंतर या निवडणुकांचे बिगुल वाजले होते. २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली राज्यभर मतदान प्रक्रिया पार पडली. ६० दिग्गज उमेदवारांच्या रिंगणात डॉ. पाटील यांनी सुरुवातीपासूनच आपली आघाडी कायम ठेवली होती. २९ आणि ३० एप्रिल रोजी झालेल्या मतमोजणीत त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. निर्वाचन अधिकारी सुनीलकुमार धोंडे यांनी अधिकृत पत्राद्वारे त्यांच्या निवडीची घोषणा करताच खान्देशातील वैद्यकीय वर्तुळात जल्लोष साजरा झाला.

या विजयाचे श्रेय डॉ. पाटील यांच्या निवडणूक रणनीतीकार डॉ. अनिता भोळे यांना जाते. मागील वर्षापासून निवडणुकीचे वातावरण तयार झाले, तेव्हापासून डॉ. भोळे यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. सर्व महत्त्वाचे निर्णय घेणे, राज्यव्यापी संपर्क जाळे विणणे आणि ’ वॉर रूम’च्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे यासाठी त्यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावच्या टीमने आधुनिक तंत्रज्ञान आणि वैयक्तिक संवादाचा प्रभावी मेळ घालत हा विजय खेचून आणला.

हा विजय म्हणजे जळगावमधील डॉक्टरांच्या एकजुटीचे प्रतीक मानले जात आहे. या संपूर्ण प्रवासात गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. वर्षा पाटील यांचे खंबीर पाठबळ लाभले. जिल्ह्यातील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांचे हितचिंतक आणि आयएमए जळगावच्या सर्व सदस्यांनी या मोहिमेत स्वतःला झोकून दिले होते. प्रचार मोहिमेत डॉ. विलास भोळे, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. अजय शास्त्री, डॉ. अतुल चौधरी, डॉ. सचिन इंगळे, डॉ. तुषार बेंडाळे, डॉ. भरत बोरोले यांच्यासह आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. धनंजय बोरोले, सचिव डॉ. पंकज शहा, उपाध्यक्ष डॉ. विनोद बाविस्कर तसेच डॉ. प्रशांत वारके यांच्या टीमने अहोरात्र मेहनत घेतली.

प्रत्यक्ष मतदानासाठी उपस्थित राहिलेले आणि अपरिहार्य कारणामुळे येऊ न शकलेल्या मात्र पाठिंबा दर्शवणार्‍या सर्व डॉक्टरांच्या विश्वासाचा हा विजय आहे. आजवर जळगाव जिल्ह्याला एमएमसीमध्ये असे थेट लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेतृत्व लाभले नव्हते. डॉ. अनिल पाटील यांच्या निवडीमुळे आता डॉक्टरांच्या समस्या, वैद्यकीय क्षेत्रातील धोरणात्मक बदल आणि आरोग्यसेवेचा विकास यावर जळगावचा शब्द अधिक प्रभावी ठरणार आहे.


 

Next Post
महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

ताज्या बातम्या

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add