• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विषारी इंजेक्शन देवून पत्नीसह मुलीची हत्या करणाऱ्या पतीला आजन्म सश्रम कारावास

जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल, आठ वर्षांपूर्वी घडली होती घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 6, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
विषारी इंजेक्शन देवून पत्नीसह मुलीची हत्या करणाऱ्या पतीला आजन्म सश्रम कारावास

जळगाव | दि. ०६ ऑगस्ट २०२४ | चारित्र्याचा संशयावरून पत्नी व मुलीला विषारी इंजेक्शन देवून त्यांचा खून करणाऱ्या सचिन गुमानसिंग जाधव याला सोमवारी जळगाव जिल्हा न्यायालयाने आजन्म सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सचिन जाधव हा पत्नी कविता आणि मुलगी रिनाक्षी यांच्यासह जळगाव शहरातील रिंगरोड येथील एका हॉस्पिटलमध्ये वास्तव्याला होते. कविता यांचा ब्युटी पार्लर चा व्यवसाय होता, आरोपी हा पत्नी कविता यांच्यावर नेहमी चारित्र्याचा संशय घेऊन छळ करायचा. दरम्यान दिनांक ५ मे २०१६ रोजीच्या मध्यरात्री त्याने पत्नी कविता आणि मुलगी रिनाक्षी हे दोघेजण गाढ झोपेत असतांना विषारी औषध इंजेक्शनद्वारे देऊन त्यांचा खून केला होता. घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात तपास अधिकारी सुप्रिया देशमुख, पोलीस निरीक्षक शाम तडवलकर आणि पोलीस उपनिरीक्षक कुबेर चौरे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. हा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायमूर्ती जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यामध्ये एकूण २४ जणांची साक्ष नोंदवण्यात आली. फिर्यादी तुषार राजपूत, डॉक्टर पाठक आणि महिलेच्या माहेरचे नातेवाईकांची साक्ष महत्त्वाची ठरली.

त्यानुसार न्यायालयाने दोषी ठरवत संशयित आरोपी सचिन गुमानसिंग जाधव याला आजन्म सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोग्यता निलेश चौधरी यांनी काम पाहिले, त्यांना एडवोकेट हर्षल राजपूत, पैरवी अधिकारी चेतन ठाकरे यांनी सहकार्य केले.

Tags: Jalgaon Crime
Next Post
मृतावस्थेत आढळली बिबट्या मादी

मृतावस्थेत आढळली बिबट्या मादी

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group