जळगाव | दि. ०४ ऑगस्ट २०२४ | येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी कल्पना शांताराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी कल्पना पाटील यांना दिले आहे.
पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणे तसेच महिलांच्या विकासासाठी कार्यरत राहून शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवणे असे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.