जळगाव | दि.१३ जुलै २०२४ | जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ जुलै रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले आहे. स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड जळगाव येथे दिनांक २५ ते २८ जुलै २०२४ ला होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड करण्यात येईल.
स्पर्धा कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ येथे होतील. स्पर्धकांनी नावनोंदणी कांताई सभागृह येथे प्रवीण ठाकरे, परेश देशपांडे, अभिषेक जाधव यांच्याकडे करावी. खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले आहे.