जळगाव | दि.२१ जुन २०२४ | आज दहावा आंतरराष्ट्रीय योगा दिन जळगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दोन हजारापेक्षा अधिक खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागाने उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन ” म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने २१ जून रोजी जळगाव जिल्ह्यात आज सकाळी हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला.
जळगाव जिल्हा प्रशासनच्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगांव, नेहरू युवा केंद्र संघटन, जळगांव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ, जळगांव जिल्हा क्रीडा संघटना महासंघ, जळगांव जिल्हा योग संघटना, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, जळगांव, यांचे संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे सकाळी ७.०० वाजता जळगांव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, प्रशिक्षणार्थी आय. ए. एस. अधिकारी वेवोतोलु केजो, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी विकास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, श्री. नरेंद्र, समन्वयक नेहरू युवा केंद्र संघटन जळगांव, सरला पाटील गट शिक्षणाधिकारी, खलील शेख, गट शिक्षणाधिकारी, रेड क्रॉसचे विनोद बियाणी, जयश्री पाटील, समाधान बर्कले, डॉ. अनिता पाटील, प्रा डॉ नारायण खडके, किशोर चौधरी, सुमेध तळवेलकर आदी मान्यवर उपस्थीत होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरुवातीला सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सर्व मान्यवरांचे योगा चे पुस्तक देऊन स्वागत केले. त्या नंतर कॉमन योगा प्रोटोकॉल नुसार सर्व उपस्थितांनी योगासने आणि प्राणायाम केले. या कॉमन योगा प्रोटोकॉल चे प्रात्यक्षिक जळगांव जिल्हा हौशी योग असोसिएशन च्या खेळाडूंनी सादर केले. अनुभुती इंग्लिश मेडियम स्कुल द्वारा म्युझिकल योगा विद्यार्थ्यांमार्फत प्रात्यक्षिक क्रीडा शिक्षक स्मिता बुरकुल, श्वेता कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सादर केले.
सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मिनल थोरात, किशोर चौधरी, भारत देशमुख, विनोद कुलकर्णी, उमेश मराठे, गोविंद सोनवणे, विनोद माने, संजय महिरे, सुरज पवार, अविनाश महाजन यांनी परिश्रम घेतले.