• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये जागतिक योग दिवस साजरा

नियमित योग करण्याचा केला संकल्प; योग अभ्यासात जनजागृती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 22, 2024
in जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये जागतिक योग दिवस साजरा

जळगाव | दि. २२ जुन २०२४ | जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या सर्व आस्थापनांमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. मानवी जीवनातील शाश्वत बाबींचा विचार केल्यास शरीर हीच खरी संपत्ती होय. कितीही संपत्ती कमावली व आपले शरीर स्वास्थ उत्तम नसेल तर त्या संपत्तीची किंमत शून्य असते. या विचारातून आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी, नियमित योग आणि व्यायामास प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे. जैन इरिगेशनतर्फे दरवर्षाप्रमाणे ‘जागतीक योग दिवसा’च्या औचित्याने जनजागृती करण्यात आली. यात नियमित योग करण्याचा संकल्प जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला.

प्रश्वास म्हणजे हृदयाची विश्रांती होय.. – सुभाष जाखेटे
योग ही आजच्या धकधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये अतिशय आवश्यक साधना आहे. योगाद्वारे शरीर आणि मनाचे ताणतणाव दूर होऊन आपला श्वास दीर्घ होतो त्यामुळे मन:शांती सोबत हृदयालासुद्धा विश्रांती मिळते. प्राणायाम आणि ध्यान करताना हाताच्या मुद्रेला महत्त्वाचे स्थान आहे. अंगठा हे परमतत्वाचे त्याच्या बाजूला असलेली तर्जनी आत्मतत्वाचे प्रतिक असते. परमतत्त्वाखाली लीन करणं आणि रज तम जस गुणाचे ती बोटे सोडून देणे या मुद्रेला अतिशय महत्त्व आहे असे सांगत सुभाष जाखेटे यांनी प्लास्टीक पार्क मधील सहकाऱ्याकडून योगसाधना करुन घेतल्यात. अंगूलीमुद्रा, ओमकारसह बिहार स्कूल ऑफ योगाचे त्रिकुट मुद्रा (टिटिके) ही आसने करुन घेतली. खांदा, मान, पाठीचा कणा यासाठी नियमित करता येणारी योगाअभ्यासही समजून सांगितला.

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनीही नियमीत योग करण्याचा संकल्प केला. यावेळी जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी सी. एस. नाईक यांच्या उपस्थित हा योगाभ्यास झाला. याप्रसंगी डॉ. राजकुमार जैन, आर.एस. पाटील, युवराज धनगर, अनिल जैन यांच्यासह मानव संसाधन विभागातील सहकारी उपस्थित होते.

जैन फूडपार्कमध्ये ११०० सहकाऱ्यांनी केला योगाभ्यास..
‘कंपनीत काम करणारा माझा प्रत्येक सहकारी सृदृढ असावा त्याला व्यसने नसावीत ही भावना कंपनीचे संस्थापक श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांची होती. चांगल्या हृदयासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आपण दररोज किमान अर्धा तास योग करावा.’ असे आवाहन योग शिक्षिका सौ. कमलेश शर्मा यांनी केले. जैन अॅग्रिपार्क, जैन फूड पार्क आणि जैन एनर्जी पार्क येथील सहकाऱ्यांसाठी सकाळी ८ वाजता जागतिक योग दिवसाच्यानिमित्ताने त्यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला त्याप्रसंगी त्यांनी सहकाऱ्यांशी संवाद साधला.

आरंभी बायो एनर्जी विभागाच्या प्रमुख डॉ. जयश्री राणे यांच्याहस्ते योगशिक्षिका सौ. कमलेश शर्मा यांचे स्वागत केले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कंपनीचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी केले. सहकाऱ्यांशी प्रात्यक्षिक साधत सूर्य नमस्कार, झुंबा, सूक्ष्म व्यायाम, प्राणायम, योग्य पद्धतीने ओमकारचा करावयाचा उच्चार या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. टिश्युकल्चर लॅबमधील महिला सहकारी देखील हिरीरीने या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. सुमारे ११०० सहकाऱ्यांनी योगाभ्यास करून घेतला. महिला सहकाऱ्यांना वटसावित्री पौर्णिमेनिमित्ताने कार्यक्रमात शुभेच्छा ही देण्यात आल्या. यावेळी योग विषयक शंकांचे समाधानही करून घेतले. जी.आर. पाटील, राजेश आगीवाल, एस.बी. ठाकरे, भिकेश जोशी, वैभव चौधरी, अजय काबरा, धीरज जोशी, सुचेत जैन, दिनेश चौधरी, बी.एम. खंबायत यांनी परिश्रम घेतले.


Next Post
भोरगांव लेवा पंचायत ठाया पाडळसे कुटुंबनायक प्रभारीपदी ललितकुमार पाटील

भोरगांव लेवा पंचायत ठाया पाडळसे कुटुंबनायक प्रभारीपदी ललितकुमार पाटील

ताज्या बातम्या

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल
गुन्हे

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group