जळगाव | दि. २० जुन २०२४ | जिल्हा सामान्य रुग्णालयात जळगाव शहरातील तसेच संपुर्ण जिल्ह्यातून दररोज सुमारे हजार ते दीड हजार रुग्ण उपचारासाठी येत असतात. दरम्यान रुग्णालयात एम.आर.आय मशीन नसल्यामुळे रूग्णांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंडासह त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात बुधवारी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून रुग्णालयातील परिस्थितीबाबत कल्पना दिली.
तसेच तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात एम.आर.आय मशीन उपलब्ध करुन द्यावे, यामागणीचे निवेदन दिले. दरम्यान याविषयी सकारात्मक चर्चा झाली असुन या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.