• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघात किती टक्के झाले मतदान, पहा..

जिल्ह्यात शांततेत पार पडली निवडणूक प्रक्रिया.. -जिल्हाधिकारी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 15, 2024
in जळगाव जिल्हा
0
रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघात किती टक्के झाले मतदान, पहा..

जळगाव, दि.१५ – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवार दि. १३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण ५८.४७% तर रावेर लोकसभा मतदार संघात ६४.२८% मतदान झाले. सोमवार दि. १३ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला दोन्ही मतदार संघात सुरुवात झाली. सांयकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती.

सकाळी ऊन होण्याच्या आधी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या अल्पबचत भवन येथे मतदान केंद्रावरची हालचाल टिपण्यासाठी वेबकास्टिंग कक्ष स्थापन करण्यात आला होता. स्वतः जिल्हाधिकारी दिवसभर या वर लक्ष ठेऊन होते. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर लक्ष ठेऊन असल्यामुळे मतदान शांततेत पार पडले.

सकाळी ११ ते १ या कालावधीत सर्वाधिक मतदान..

जिल्ह्यात सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत सर्वाधिक मतदान झाले. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर सकाळच्या वेळेत गर्दी झाल्याचे दिसून आले. दुपारी उन्हाची वेळ झाल्यानंतर मात्र गर्दी ओसरली.

मतदानाची टक्केवारी..

जळगाव लोकसभा मतदार संघात ६ लक्ष २८ हजार १२३ पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर ५ लक्ष ३७ हजार ८२७ महिला मतदारांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजाविला. तर १८ तृतीयपंथी यांनी मतदानाचा हक्क वाजविला. एकूण ६०.५५% पुरुष, ५६.२२% महिला व २१.१८% तृतीयपंथी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असे एकुण ५८.४७% मतदान झाले.

रावेर लोकसभा मतदार संघात ०६ लक्ष २१ हजार ९८३ पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर ०५ लक्ष ४८ हजार ९५० महिला मतदारांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजाविला, तर ११ तृतीयपंथी यांनी मतदानाचा हक्क वाजविला. एकूण ६६.०५% पुरुष, ६२.३८% महिला व २०.३७% तृतीयपंथी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असे एकुण ६४.२८% मतदान झाले.

मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव स्पर्धा..

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदान वादविण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी परीक्षक मंडळनियुक्ती करण्यात आले होते. त्याचा निकाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केला.


 

Next Post
नेताजी सुभाष चौकामध्ये हमाल-कामगार बांधवांतर्फे पाणपोईचे उद्घाटन

नेताजी सुभाष चौकामध्ये हमाल-कामगार बांधवांतर्फे पाणपोईचे उद्घाटन

ताज्या बातम्या

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग
खान्देश

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग

September 22, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
खान्देश

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात

September 22, 2026
भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात
खान्देश

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात

September 22, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
कृषी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 22, 2026
जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड
खान्देश

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

September 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add