जळगाव, दि. १६ – शहरातील श्री जैन युवा फाउंडेशन आणि सुमिरा गांधी परिवाराच्या सहकार्याने नेताजी सुभाष चौकातील बोहरा बाजार येथे हमाल- कामगार बांधवांतर्फे पाणपोईचे अनावरण करण्यात आले. सुभाष चौक परिसरामध्ये शेकडो हमाल बांधव हे ४० ते ४५ तापमानामध्ये देखील श्रमाचे काम करतात. त्यांच्या प्रकृतीची काळजी असावी म्हणून पाणपोई उभारण्यात आली आहे.
पाणपोईचे उद्घाटन रवी नाथ, अरुण नाथ, प्रवीण कुंभार या हमाल बांधवांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेला श्री जैन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर राका, अंकित जैन, रिकेश गांधी उपस्थित होते. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये श्रमाचे काम करणाऱ्या हमाल बांधवांना वाढत्या तापमानाचा फार त्रास होत असतो. यामुळे त्यांची काळजी म्हणून हमाल- कामगार बांधवांकडून बोहरा बाजारात पाणपोई बांधण्यात आली आहे.
तसेच, शहरातील श्री जैन युवा फाउंडेशन आणि सुमिरा गांधी परिवाराच्या सहकार्याने ४५ हमाल बांधवांना बागायती रुमालाचे वाटप करण्यात आले. सुमिरा गांधी परिवारातर्फे संजय गांधी, अजय गांधी, रिकेश गांधी, पियुष व आयुष गांधी उपस्थित होते.