• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हुकूमशाही सरकारला जनताच आता घरी पाठवणार जामनेर मेळाव्यात शरद पवार यांचे टीकास्त्र

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 22, 2024
in राजकीय
0
हुकूमशाही सरकारला जनताच आता घरी पाठवणार जामनेर मेळाव्यात शरद पवार यांचे टीकास्त्र

जामनेर, दि.२२ – देशात सर्वच जनता केंद्र सरकारच्या कारभाराला कंटाळी आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाह सारखे वागतात. या हुकूमशाही सरकारला आता जनताच घरी बसवणार आहे असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केला.यावेळी जामनेर तालुक्यातून ८० हजार मताधिक्याने श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आश्वासन उपस्थितांनी शरद पवार यांना दिले.

रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ जामनेर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. तर यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या पधाधिकाऱ्यानी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

व्यासपीठावर माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार राजीव देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, हिरालाल राठोड, डी. के पाटील, अजीज मलिक, जामनेर राष्ट्रवादी काँग्रेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उबाथ गट तालुकाध्यक्ष ऍड ज्ञानेश्वर बोरसे, राष्टवादी किसन सेलचे जिल्हाध्यक्ष सोपं पाटील राजू बोहरा वाल्मिक पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

माजी आ. सांतोष चौधरींची एंट्री आणि घोषणाबाजी..
मेळाव्यात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींची एंट्री होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार शरद पवार , संतोष चौधरी यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अधिकाधिक प्रयत्न करून श्रीराम पाटील यांना निवडून आणू असे सांगत शरद पवार यांच्या शब्दाच्या बाहेर आपण नसल्याचा निर्वाळा संतोष चौधरी यांनी दिल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.


 

Next Post
जळगाव लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार दिल्लीला मोठ्या मताधिक्याने पाठवणार.. – अनिल भाईदास पाटील

जळगाव लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार दिल्लीला मोठ्या मताधिक्याने पाठवणार.. - अनिल भाईदास पाटील

ताज्या बातम्या

कुरिअरचे पार्सल चोरणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात; ९६ हजारांचे ४ मोबाईल हस्तगत
गुन्हे

कुरिअरचे पार्सल चोरणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात; ९६ हजारांचे ४ मोबाईल हस्तगत

April 3, 2026
शहर पोलीस शोध पथकाची मोठी कारवाई; दोन घरफोडींचे गुन्हे उघड, तीन अट्टल चोरटे जेरबंद
गुन्हे

शहर पोलीस शोध पथकाची मोठी कारवाई; दोन घरफोडींचे गुन्हे उघड, तीन अट्टल चोरटे जेरबंद

April 2, 2026
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी लिनेस क्लबचा ‘शितल’ आधार
जळगाव जिल्हा

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी लिनेस क्लबचा ‘शितल’ आधार

April 2, 2026
धानोरा नगरीत भक्तीचा शंखनाद; २० एकर परिसरात रंगणार ‘महाविष्णू याग’ अन् ‘दशावतार मूर्ती’ प्राणप्रतिष्ठा सोहळा!
जळगाव जिल्हा

धानोरा नगरीत भक्तीचा शंखनाद; २० एकर परिसरात रंगणार ‘महाविष्णू याग’ अन् ‘दशावतार मूर्ती’ प्राणप्रतिष्ठा सोहळा!

April 1, 2026
सिल्लोडच्या दोन तरुणांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई
गुन्हे

सिल्लोडच्या दोन तरुणांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

April 1, 2026
मैदानावर पत्रकार भिडले! ‘प्रेस फोटोग्राफर’ संघाने कोरले विजेतेपदावर नाव
क्रिडा

मैदानावर पत्रकार भिडले! ‘प्रेस फोटोग्राफर’ संघाने कोरले विजेतेपदावर नाव

March 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group