जळगाव, दि. २२ – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमळनेरकरांबरोबर विविध मुद्द्यांवर सकारात्मक संवाद घडून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कर्तृत्वाने देशाला जगभरात लौकिक प्राप्त करवून देत आहेत. त्यांच्या या अतुलनीय कार्यात त्यांना साथ देण्याचा संकल्प यावेळी अमळनेर च्या सूनबाईला केला.
यावेळी राज्याचे मदत व पुनर्विकास मंत्री अनिल पाटील, जयश्री पाटील, अशोक पाटील, व्ही.आर. आप्पा, भिकेश पाटील, भागवत पाटील, मोहन सातपुते, योगेश मुंदडा, डॉ. अपर्णा मूठे, मुख्तार खाटीक, प्रथमेश पवार, प्रदीप अग्रवाल, लालचंद सैनानी, यशवंत बैसाने, सत्तार तेली, विजय राजपूत, संजय पाटील, डॉ. अशोक पाटील, ऋषभ पारख आदी मान्यवर उपस्थित होती.