• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

केळी पीक विमा अपील पात्र प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 14, 2024
in जळगाव जिल्हा
0
केळी पीक विमा अपील पात्र प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

जळगाव, दि.१४ – जळगाव जिल्ह्यातील केळीच्या पीक विम्या बाबत ज्यांचे प्रकरण नामंजूर झालेले आहेत. त्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने गंभीर दाखल घेतली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला १०६१९ नामंजूर प्रकरण होती. त्याची फेरतपासणी करून अपील पात्र झालेल्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. केळी पीक विम्या बाबत 2 फेब्रुवारी रोजी विविध संघटनाकडून मोर्चा काढला होता. त्याअनुषंगाने ठरल्याप्रमाणे १४ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील, मुमराबाद कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ हेमंत बाहेती, बाळासाहेब बाळके, अभिनव माळी, भरत वारे व डी.बी. लोंढे, रावेर, मुक्ताईनगर, यावल व चोपडा या तालुक्याचे कृषी अधिकारी तसेच जिल्हा विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील एकूण केळी पीक विमा प्रस्तावा मध्ये जिल्हयातील १०६१९ नामंजूर करण्यात आले आहेत त्या प्रस्तावांमधील बहुतांश केळी पिकाचे क्षेत्र हे चोपडा, यावल, रावेर, जळगाव व मुक्ताईनगर या तालुक्यातील असल्याने तेथील तालुका कृषि अधिकारी यांना देखील या बैठकीला बोलावण्यात आले होते. त्यानुसार रावेर, यावल, मुक्ताईनगर, जळगाव व चोपडा या तालुक्यात ७९७१ इतक्या शेतक-यांचे पिक विमा प्रस्ताव दाखल करण्यात आलेले असुन त्यापैकी ५२३५ शेतक-यांनी तालुकास्तरीय समिती कडे अपील दाखल करण्यात आलेले होते. त्यापैकी ३८५६ अपील पात्र असुन १३७९ अपील अपात्र करण्यात आलेले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी लक्ष घालून जिल्हा प्रशासनाला याबाबत पात्र शेतकऱ्यांच्या हक्काची विमा रक्कम मिळावी यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.


 

Next Post
गांधीजींना अभिप्रेत ‘रामराज्या’तील लोकप्रतिनिधी बनण्याचा प्रयत्न!

गांधीजींना अभिप्रेत 'रामराज्या'तील लोकप्रतिनिधी बनण्याचा प्रयत्न!

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात साजरा

May 19, 2026
अघोषित लोडशेडिंगमुळे जळगावकर हैराण; आमदार राजूमामा भोळेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
जळगाव जिल्हा

अघोषित लोडशेडिंगमुळे जळगावकर हैराण; आमदार राजूमामा भोळेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

May 16, 2026
राष्ट्रीय बास्केटबॉल शिबिरासाठी जळगाव जिल्ह्यातील भाग्येश पाटील ची निवड
क्रिडा

राष्ट्रीय बास्केटबॉल शिबिरासाठी जळगाव जिल्ह्यातील भाग्येश पाटील ची निवड

May 16, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी

May 16, 2026
कमी वजन, मुदतपूर्व जन्म… तरीही जिद्दीने जिंकली मृत्यूशी झुंज!
आरोग्य

कमी वजन, मुदतपूर्व जन्म… तरीही जिद्दीने जिंकली मृत्यूशी झुंज!

May 15, 2026
नोकरीची सुवर्णसंधी | जिल्ह्यातील युवकांसाठी ‘शिका व कमवा’ या धोरणाअंतर्गत भरती मेळावा
जळगाव जिल्हा

नोकरीची सुवर्णसंधी | जिल्ह्यातील युवकांसाठी ‘शिका व कमवा’ या धोरणाअंतर्गत भरती मेळावा

May 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group