जळगाव, दि. २४ – युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. युवासेना सचिव वरूण सरदेसाई, युवासेना कार्यकारिणी सदस्य या सह युवासेनेचे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांच्या मुख्य उपस्थितीत सदर बैठक संपन्न होणार आहे.
बैठकसाठी जिल्ह्यातील आणि तालुक्यातील युवासेनेचे जिल्हा, उपजिल्हा आधिकारी, विधानसभा आधिकारी, तालुका आधिकारी, महानगर अधिकारी, शहर आधिकारी व युवासेनेच्या काम करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांनी २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता शिवसेना भवन येथे उपस्थितीत राहावे असे आवाहन युवासेना विस्तारक चैतन्य बनसोडे यांनी केले असल्याचे युवासेनचे जळगाव महानगर युवाधिकारी विशाल वाणी यांनी कळविले आहे.