• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 2, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

जळगाव, (प्रतिनिधी) : अमळनेर येथील अवघ्या तीन महिन्यांच्या बालिकेवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून तिचे प्राण वाचविले आहेत. गंभीर अवस्थेत व्हेंटीलेटरवर दाखल करण्यात आलेल्या या शिशुला दहा दिवसांच्या अथक उपचारांनंतर नवजीवन मिळाले असून सध्या तिची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे.

याबाबत माहिती अशी की, अमळनेर येथील मोनीस हारून शेख यांच्या तीन महिन्यांच्या बालिकेला काही दिवसांपासून तीव्र ताप येत होता. त्यासोबतच तिला वारंवार झटके येण्यास सुरुवात झाली. प्रकृती बिघडत असल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने धुळे येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे तिची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर (व्हेंटीलेटर) ठेवण्यात आले. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने आणि अधिक प्रगत उपचारांची आवश्यकता असल्याने तिला हायर सेंटर असलेल्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले.

रुग्णालयात दाखल होताच एनआयसीयू व पीआयसीयू  विभागातील तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार, डॉ. उमाकांत अणेकर यांनी बालिकेची सखोल तपासणी सुरू केली. बालिकेच्या पाठीतील पाणी तपासणी, मेंदूचा एमआरआय तसेच विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांच्या आधारे बालिकेला ‘एनसेफेलायटीस’ (मेंदूची सूज) हा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. निदान स्पष्ट झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ओमश्री गुडे, डॉ. कुशल धांडे, डॉ. विशाल कोठावडे, डॉ. नवेद खान, डॉ. मिमोनी कुंभारे, डॉ. सृष्टी भिरूड, डॉ. अस्मिता गायकवाड, डॉ. निशीगंधा सोनवणे, डॉ. भारती झोेपे या टीमने तत्काळ उपचार पद्धतीत बदल करून प्रतिबंधात्मक औषधांचा डोस वाढविला.

बालरोगतज्ज्ञ, अतिदक्षता विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांनी सातत्याने बालिकेवर लक्ष ठेवत उपचार सुरू ठेवले. उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत गेल्याने बालिकेची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. दहा दिवसांच्या उपचारांनंतर तिला व्हेंटीलेटरमधून बाहेर काढण्यात आले आणि अखेर तिची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आली. विशेष म्हणजे या बालिकेवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात आले. त्यामुळे कुटुंबीयांना कोणताही आर्थिक भार सहन करावा लागला नाही. गंभीर अवस्थेतील शिशुला वेळेवर योग्य निदान आणि अत्याधुनिक उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचविणे शक्य झाले. पीआयसीयू विभागातील हिरामण लांडगे यांनीही कागदपत्राच्या पूर्ततेसाठी सहकार्य केले.

बालिका आमच्याकडे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. तिला ताप आणि झटक्यांसह श्वसनाचा त्रासही होता. आवश्यक तपासण्यांमधून एनसेफेलायटीसचे निदान झाल्यानंतर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. आमच्या एनआयसीयू व पीआयसीयू टीमच्या समन्वित प्रयत्नांमुळे बालिकेची प्रकृती सुधारली आणि तिला नवजीवन देता आले. लहान मुलांमध्ये तापासोबत झटके किंवा असामान्य लक्षणे दिसल्यास पालकांनी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. नवेद खान, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

Next Post
मैत्रिणीने पाशवी जाळ्यात ओढले; तरुणीवर अमली पदार्थ पाजून अत्याचार

मैत्रिणीने पाशवी जाळ्यात ओढले; तरुणीवर अमली पदार्थ पाजून अत्याचार

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add