• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 2, 2026
in जळगाव जिल्हा
0
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

जळगाव, (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या अन्नपुर्णालयम पुढाकार घेत कृषि तज्ञांच्या मदतीने  गोबर गॅस प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज तब्बल १० ते १२ गॅस सिलेंडरची बचत होत असून पर्यावरण संरक्षणासोबतच इंधन बचतीलाही मोठा हातभार लागत आहे.

हा प्रकल्प आज ऊर्जा निर्मिती, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन, इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षण यांचा उत्कृष्ट समन्वय साधणारा आदर्श मॉडेल बनला आहे.महाविद्यालय परिसरातील पशुधनातून मिळणारे शेण, अन्नपूर्णा भोजनालयातील उरलेला अन्नकचरा तसेच इतर सेंद्रिय पदार्थांचा वापर करून या प्रकल्पात दररोज सुमारे ४ ते ६ टन बायो-वेस्ट प्रक्रियेत वापरला जातो. या प्रक्रियेतून दररोज अंदाजे १६० ते २०० किलो बायोगॅसची निर्मिती केली जाते. काही वेळा सरासरी १६० ते २०० किलोपर्यंत गॅस उत्पादन होत आहे.

भविष्यातील ऊर्जा संकट आणि पर्यावरणाची गरज ओळखून महाविद्यालय प्रशासनाने त्यावेळीच ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली होती. आज हा प्रकल्प संस्थेसाठी आदर्श ठरत आहे. महाविद्यालयाच्या अन्नपूर्णालयामध्ये दररोज सुमारे २ ते अडीच हजार लोकांचा स्वयंपाक केला जातो. या स्वयंपाकासाठी लागणार्‍या इंधनाचा मोठा भाग गोबर गॅस प्रकल्पातूनच उपलब्ध होतो. चहा, नाश्ता तसेच गरम पाणी तयार करण्यासाठीदेखील याच गॅसचा वापर केला जातो. त्यामुळे एलपीजीवरील खर्चात मोठी बचत होत आहे. वेस्ट टू एनर्जी ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यात हा प्रकल्प यशस्वी ठरत आहे.

अन्नपूर्णालयाचे प्रमुख डी. टी. राव तसेच डॉ.उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारण्यात आला. त्यांच्या पुढाकारामुळे आज हा प्रकल्प ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता अभियानासाठी प्रेरणादायी ठरत आहे.महाविद्यालय प्रशासनाच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यात अशा पर्यावरणपूरक प्रकल्पांची गरज अधिक वाढणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Next Post
अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add